१८ यशाचा कानमंत्र

१८ यशाचा कानमंत्र

 

तुमच्या ध्येयाकडे तुमची ओढ कशी असावी? आम्ही लहानपणी गावाकडे विहिरीत, नदीवर पोहायला शिकलो. तो कमरेला भोपळा बांधून. कारण तो भोपळा पाण्यात बुडू देत नाही. आम्ही आमच्या शेतात गुरे चारायला जायचो. गाव आणि शेतीमध्ये नदी होती. पावसाळ्यात नदीला पूर आला की आम्ही आमच्या गाय बैलांना त्या पुरात ढकलायचो, आणि त्यांचे शेपूट धरून त्या साह्याने दुसऱ्या टोकाला जायचो. मला आश्चर्य वाटायची की, आम्ही हाता पायाने पाणी कापत पोहत जातो. पण या जनावरांचे हातपाय खांबासारखे सरळ असतानाही ते पोहोत दुसऱ्या टोकाला कसे जातात ? कारण त्यांना घराची ओढ असते म्हणून ते पोहोत जातात. तुमची परीक्षा म्हणजे नदी आहे आणि तुमची पुस्तके आणि गुरुजी म्हणजे तुमचे भोपळे आहेत. त्याचा उपयोग परीक्षेत नाही तर परीक्षेच्या अगोदर करायचा व यशस्वी व्हायचे. तुमच्याकडे जिद्द व चिकाटी असेल तर काय होऊ शकते. आपण एखाद्या किल्ल्यावर किंवा दगडी, सिमेंटच्या घरावर पिंपळ उगवलेला पाहतो. पिंपळाचे बी मोहरीपेक्षा बारीक असते. कावळा शी करतो आणि त्याच्या विष्ठेतून ते बी बारीक फटीत पडते. आणि त्यातून पिंपळ उगवून डोलदार फुलतो. तुम्ही छनी हातोड्याने त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नसते. तुम्हाला इतके अवघड काम करायचे नाही. पुस्तक लिहिणे खूप अवघड असते. तुम्हाला रेडिमेड पुस्तकातून व गुरुजींनी शिकलेले तेच समजून उमजून यश मिळवायचे असते.

 

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://nagebabaudyojakmanch.org/१८-यशाचा-कानमंत्र-3/

error: Content is protected !!