अपयश ही यशाची पहिली पायरी नाही !
यशस्वितेसाठी पर्याय शोधा
मित्रांनो, असे म्हणतात की, Hope for the best but prepare for the worst. जर प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर दुसरा तिसरा पर्याय शोधला पाहिजे. प्रयत्न करताना वेळोवेळी सिहावलोकन केले पाहिजे. सिह जंगलाचा राजा असतो, पण तरीही तो थोडे पुढे गेल्यावर मागे वळून पाहतो… आपला कोणी पाठलाग तर करीत नाही ना? सिंहावलोकन म्हणजे Review… आपल्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी तयार असेल; तर अपयशाचा यशस्वी सामना करता येतो. स्वतःला सावरू शकतो.
SW, SW, SW चा फॉर्म्युला
या फॉर्म्युलातील SW म्हणजे Some Will, Some Want व So What?…
पहिला SW म्हणजे काही लोक आपले ऐकतील. दुसरा SW म्हणजे काही लोक आपले ऐकणार नाहीत, आपल्याला अपेक्षित प्रतिसाद देणार नाहीत, याचीही तयारी आपण ठेवली पाहिजे. तिसरा SW म्हणजे So What.. म्हणून काय झाले? एखाद्याने ‘नाही’ म्हटले म्हणजे सगळे जगच नाही म्हणेल असे काही नसते. मी दुसरा, तिसरा पर्याय शोधेन. जोपर्यंत होकार मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहीन. यासाठी माझे ध्येय, माझा Goal, SMART असला पाहिजे. स्मार्ट म्हणजे, Specific, Measurable, Achieveble, Realistic, Time bound and Trusted आहे का, हे सिंहावलोकन करून तपासावे लागेल.
मृगजळामागे किती घावायचे?
आजकाल शिक्षित तरुणाईचे लक्ष्य सुरक्षित, प्रतिष्ठित नोकरीसाठी यूपीएससी, एमपीएससीकडे जास्त असते. दरवर्षी तीन ते चार लाख उमेदवार स्पर्धापरीक्षा देतात. यातील यशस्वी होतात अवघे तीनचारशे. बाकीच्यांसाठी पुनश्च हरिः ॐ अशी परिस्थिती असते. तीन चार वर्षे स्पर्धापरीक्षांचा कसून अभ्यास केला जातो. बाकीच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिले जात नाही. परंतु असे वारंवार प्रयत्न करूनही अंतिम लक्ष्य गाठता येत नाही, तेव्हा मग नैराश्य येते. स्पर्धापरीक्षेत यशस्वितेचे प्रमाण फक्त ०.१ टक्का इतकेच आहे. अशा वेळी या परीक्षांचा ध्यास घेताना वर्ष-दोन वर्षात स्वतःच स्वतःची कुवत समजून घेतली पाहिजे. अन्यथा स्पर्धापरीक्षा ही मृगजळासारखी ठरू शकते. आपण सुरुवातीलाच राष्ट्रीयीकृत बँक, रेल्वे, एलआयसी असे दुसरे, तिसरे पर्याय मनात ठेवले पाहिजेत, जेणेकरून नैराश्य येणार नाही.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
