उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

तुला आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचंय…

दहा-बारा दिवसांनी कॉलेज सुरू होणार होते. आता मी व बंधूंना औरंगाबादला राहण्यासाठी जावे लागणार होते. घरापासून प्रथमच इतक्या दूर एकटेदुकटे राहायचे असल्याने आम्ही दोघेही जरा नाराजच होतो. पण शिकावे तर लागणारच! त्यामुळे आम्ही रॉकेलचा स्टोव्ह, तवा, दोन तांबे, दोन ताटं, धान्य, पीठ, मीठ, मिरची, मसाला, डाळ, तांदूळ, कपडे, चादरी असा जामनिमा एका पत्र्याच्या पेटीत घालून निघालो. माझे कॉलेज सुरू झाले असल्याने मी लगेचच माझे शिक्षण सुरू केले. मोठ्या बंधूंचे कॉलेज सुरू होण्यास आणखी काही काळ होता. आम्ही तेव्हा आमच्या गाववाल्यांच्याच खोलीत उतरलो होतो. मी कॉलेजात गेल्यावर माझे वडील, भाऊ औरंगाबादेत खोली पाहत होते. आम्हाला औरंगाबादेत समर्थनगर परिसरात २५ रुपये भाड्याने एक खोली मिळाली. आम्ही आमचा बिस्तरा तिथे हलविला. सुरुवातीचे दोन-तीन दिवस वडील आमच्यासोबत राहिले. त्यांनी आमचे रांगेला लावून दिले. त्यांना आता गावी जायचे होते. मी व भाऊ त्यांना सोडायला एस.टी.स्टँडवर गेलो. आमच्या खोलीपासून स्टैंड एक किलोमीटर अंतरावर होते. वडील आपल्याला सोडून जाणार व आपण इथे एवढ्या लांब कसे राहायचे? गावकडचे मोकळे वारे, आई, आजी, आजोबा, सगळे भाऊ तिकडे आणि आपण इकडे, मोठ्या शहरात. आपले कसे होणार, असे वाटून मी एकदम रडायला लागलो. माझे पाहून भावाच्याही डोळ्यात पाणी आले. वडीलही आमच्याकडे पाहून भावनिक झाले. त्यांनी मला सांगितले, “तुला आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, शिकला नाहीस, तर ते कसं पुरं होईल?” हे ऐकून मी स्वतःला सावरले. डोळे पुसले.
वडील एकदा म्हणालेही, “नसेल करमत, तर चला मग सगळेच माझ्यावरण मंतर मी नाही गहणाली व भाऊजी नाही म्हणाला, भग आम्ही वडिलांना निरोप दिला व खोरपेवर परतली.

खोलीपासून आमचे कॉलेज दोन किलोमीटरवर होते. मोठ्या भावाचे कॉलेज सुरु होयचे होते. ती माला दररोज कॉलेजवर पायी सोडायला यायचा, मधल्या काव्यात परंत खोलीवर जायचा, स्वर्णपाक गरीर करायचा, परत मल्प घ्यायला यायचा. आम्ही संध्याकाळी जेवणखाण आटोपून परत स्टँडवर येऊन बसायचो, दोघांनाही करमत नसायचे. स्टँडवर नगरकडे जाणारी गाडी दिसली तरी मनाला खूप बरे वाटायचे. दुपारी कधीकधी आम्ही स्टँडच्या बाजूलाच असलेल्या सिद्धार्थ उद्यानात जाऊन बसायचो. करमत नव्हते, खूप एकटेएकटे वाटायचे; पण आजोबांन शब्द आठवले, पुन्हा अभ्यासात्य लागायची. असा आमचा दिनक्रम सुरू होता. भावाचेही कॉलेज सुरू झाले होते.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!