उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

साखरकारखान्याचा हुकलेला डाव…

त्या काळी एफ. वाय. नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळायचा. मी तर काठावर पास झालो होतो, त्यामुळे या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांना नंबर लागणे अशक्य होते. त्यामुळे मी बीएस्सी करायचे ठरविले, गणिताची सुरुवातीपासून आवड असल्याने मी एस. वाय.ला गणित विषय ठेवला होता. तिसऱ्या वर्षाला स्पेशल विषय घ्यावा लागायचा. मला गणितातच बीएस्सी करायची इच्छा होती. पण या काळात आमच्या कड्याजवळ मोठा सहकारी साखरकारखाना सुरू झाला होता. माझे एक चुलतमामा होते बी. एन. मुटकुळे. ते त्या कारखान्यावर डायरेक्टर (संचालक) होते. ते मला ‘जावई’ म्हणायचे. त्यांनी मला सांगितले, “जावई, तुम्ही केमिस्ट्रॉ हा स्पेशल विषय घ्या. कारखान्यात बीएस्सी केमिस्ट्री झालेल्यांना नोकरीची संधी असते. पास झाला की, तुम्हाला भरखान्यावर नोकरी लावून देतो.” मामांचे ऐकून भी तिसऱ्या अर्थात्य केमिस्ट्री विषय घेतला मास केमिस्ट्रीत तितकीशी गती नव्हती, पण मी बऱ्यापैकी मामी निकाल लागल्यापर मी माभांना जाऊन भेटतो व नोकरीचे काय, असे विचारले. मामा णाले, “सध्याचान्यात विरोधी व्य सत्ता आहे. आपली धत्ता असती, तर लगेच तुम्हाला ईन करून घेतले असतं तोपर्यंत तुम्ही एक काम करा, एत्थ्एलबीला अॅडमिशन प्या. वकील झाल्यावर कोर्टात प्रक्टिस करा, नाही तर मग राजकारणात सक्रिय व्हा.” त्या काव्यत यकिलीचे आणि राजकारणाचे जवळचे नाते होते. वकिली पेशाबाबत लोकांमध्ये तसाही जरा वेगजळाय आदर असतो. वकिलांचा दबदवाही असती. त्यामुळे मामांनी मला हा सल्ला दिला. मधल्या काळात डिबी मिळविल्यावर भरा खासगी कंपन्यात नोकरीच्या संधी होत्या. केमिकल कंपनीत कुठेही लगेच जॉब मिळाला असता. पण मला सरकारी नोकरीच करायची होती. त्यासाठी मी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नावनोंदणीही केली. त्या काळात एम्प्लॉयमेंट एक्स्चेजकडून सरकारी नोकरीचे कॉल उमेदवारांना पाठविण्यात येत असत. कॉलमी बाट पाहत असताना मार्माच्या सल्ल्यानुसार भी औरंगाबादलाच एलएलबीला अॅडमिशन घेतली. माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज तेव्हा प्रसिद्ध होते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!