उत्पादन व्यवसायात असलेल्या संधी आणि धोके
प्रचंड वाढणारी स्पर्धा, अस्थैर्य आणि आव्हानाच्या या काळात मोठमोठे प्रश्न भेडसावत असतात. यात व्यवसाय क्षेत्रही मागे नाही. किंबहुना व्यवसायात जास्त स्पर्धा आणि जोखीम असते. व्यवसाय करणार्याला याचा चांगलाच अनुभव असतो, पण व्यवसायात नव्याने येवू इच्छिणार्याला याची किमान जाणीव तरी असणे गरजेचे आहे, कारण आज अनेक व्यवसाय जोरशोरमध्ये सुरू होतात आणि तेवढ्याच वेगाने बंदसुद्धा होतात.
याची अनेक कारणे असतात, पण अपुरी माहिती हे त्यातलेच एक कारण आहे. व्यवसायात उतरताना कोणता व्यवसाय करू असा प्रश्न असणार्यांना किमान व्यवसायाचे चांगले पर्याय माहिती असणे जास्त गरजेचे आहे. हीच गरज हेरून आपल्याला उत्पादन प्रकारच्या व्यवसायाची ओळख करून देणार आहोत; जो एक चांगली कमाई करून देवू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग हा एक असा व्यवसाय आहे जो आपल्याला चांगला व्यवसाय आणि यातून उत्पन्न मिळवून देवू शकतो. उत्पादन म्हणजेच वस्तू तयार करणे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होय. कोणत्याही प्रकारचे उत्पादन तयार करण्यासाठी साहित्य, यंत्रसामग्री, जागा अशा अनेक गोष्टींची गरज असते.
तुम्ही कोणत्याही वस्तूचे उत्पादन करू शकता. मात्र असा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो कसा चालतो हे समजून घेणे आवश्यक आहे. दोन प्रकारची उत्पादने यशस्वी होऊ शकतात. एखादे उत्पादन जे बाजारात उपलब्ध नाही असे किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही उत्पादनातून उत्तम दर्जाचे उत्पादन तयार करणे.
लेखक- अज्ञात
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
