चौफेर घोडदौड
मी करोडपती झालो
रक्तदानामुळे मिळणारी सुटी तसेच अन्य सार्वजनिक सुट्यांचा पुरेपूर उपयोग करीत मी बिझनेसमध्ये एक एक पायरी वर चढत होतो. आमच्या कंपनीत सातव्या पदाला टॉप कोड म्हणत. त्या पदाचे नाव होते इन्स्पेक्टर या पदावर करोडपती टॉप कोड होण्याचे अनेकांचे स्वप्न असायचे पण माझी नजर ऑल इंडिया (पॅन इंडिया) लेव्हलच्या प्रथम क्रमांकावर होती. ते शिखर मला खुणावत होते. अखिल भारतात प्रथम येण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. खूप काह केले. पण मला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिला क्रमांक अहमदाबाद येचील मॅडेट्रा नावाच्या गुजराती गृहस्थाने मिळविला होता. त्याचा बिझनेस होता ११ कोटी २ लाखांचा. तर माझा म्हणजे पत्नीच्या एस. एन. धुमाळ हिच्या नावावर बिझनेस होता १० कोटी ७७ लाखांचा. सुमारे पंचवीस लाखांचा फरक आमच्यात होता. कंपनीला बिझनेस देण्यात मी करोडपती निश्चितच झालो होतो. पण तेवड्यावर भी अजिबात समाधानी नव्हतो. मला स्वतःला वैयक्तिक करोडपती व्हायचे होते. माझे नाव नवनाथ बाबूराव धुमाळ म्हणजे एन. बी. धुमाळ, पण माझ्या बिझनेसमधील लोक मला ओळखत होते एस. एन. धुमाळ नावाने म्हणजे सुनंदा नवनाथ धुमाळ नावाने, सर्वसाधारणपणे बायकांची ओळख नवऱ्याच्या नावामुळे होते. मी मात्र ओळखला जायचो बायकोच्या नावाने. असे आमचे जरा वेगळेच गणित होते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
