८ . Good superiors
आपण तळागाळातले कर्मचारी किंवा सहकारी यांच्यावर देखरेख करण्यासाठी जे अधिकारी नेमताल ते त्या लोकांपेक्षा बुद्धीमान अनुभवी आणि परीपक्व असे नेमा. आता अर्थ सरळ आहे की ज्याला तुम्ही सुपीरीयर म्हणन पाठवणार तो सगळ्याच बाबतीत सुपर असला पाहिजे ना. आणि असा सुपर असणारा माणूस खालच्या टीमकडून सुपर काम करुन घेऊन निकाल चांगला देईल ना!
लक्षात ठेवा तुम्ही कंपनी, संस्था, संघटना सांभाळण्यासाठी नेमलेली माणसं तुमच्यासारखीच तळमळीची आणि तुमच्याप्रमाणेच ध्येयवादी असली पाहीजेत. टंगळमंगळ लोकांना ही जागा देऊ नका. खुषमस्कऱ्यांना तर अजिबात देऊ नका. स्पष्ट आणि खरे बोलणारे प्रामाणिक काम करणारे लोकच या पदासाठी निवडा. लक्षात ठेवा हेच लोक तुमचे डोळे आणि कान आहेत म्हणून ते विश्वासू आणि सक्षम ठेवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
