जगमान्य प्रेरणादायी घटक

८ . Good superiors:

महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी २७ वर्ष मोगलांशी झुंज देऊन स्वराज्य कायम केलं आणि ८०० वर्षाची पातशाही पालथी केली. असाच ऋणानुबंध नेता आणि कार्यकर्ता, व्यवस्थापक आणि कर्मचारी यामध्ये असल्यावर मागे पळून पाहण्याचे काम नाही आणि मैदानातून पळून जाण्याचे तर कामच नाही.

त्या नेत्याच्या मृत्यूनंतरही जर त्याचे अनुयायी त्याच मार्गाने चालत राहतील तर नक्की समजा त्या नेत्याचे कार्यकर्त्यांबरोबर मधुर संबंध होते. अन्यथा तो मेला आणि दुसऱ्या वर्षी तो मेला हेही लोकांना आठवत नसेल तर समजून घ्या तो नेता मरण्याअगोदरच मेलेला होता. कारण त्याने सहकारी, कर्मचारी, अनुयायी यांचे शोषण केलेले असणार आणि त्याची परतफेड म्हणून लोक त्याला विस्मृतीत घालवणार. जिवंत असेपर्यंत पदावर असेपर्यंत गाजावाजा होतो तो नेता नव्हेच. तर ज्याच्या मृत्युनंतरही त्याचा आदर्श आदर, पराक्रम, किर्ती आणि चारित्र्य लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी उपयोग
होतो, चिरंतन उपयोग होतो असाच नेता प्रेरणादायी असतो, यशस्वी असतो हे लक्षात ठेवा.

यासाठी महाराजांपेक्षा मोठे उदाहरण कोणाचे देता येईल का ? म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराज या नावातच एवढी प्रेरणा आहे ज्यापुढे ३३ कोटी देवांची पलटणच बाद होते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!