३. Initiative पुढाकार घेता आला पाहिजे
महाराजांनी सुरतेवर टाकलेले दोन छापे, बुऱ्हाणपूर कारंजा जालना कारवार आदी बाजार पेठावर टाकलेले छापे, प्रतापगडची लढाई, पन्हाळा प्रसंग कांचनबारीत केलेला पराक्रम अशी सर्व घटना पाहिल्या मुळेच महाराजासमोर फुशारकी मारायची कोणा सेनापती किंवा मंत्र्याची हिंमत झाली नाही. जेव्हा नेताच पराक्रमी असतो तेव्हा अनुयायांनी त्याला काय शहाणपण शिकवायचे आणि म्हणून नेता व्हायचंय तर अगोदर शहाणे व्हा. योग्य वेळी योग्य निर्णय कोणालाही विचारण्याच्या भानगडीवर अवलंबून न राहता कृती करण्याची धमक ठेवा. तुम्हाला यश मिळणारच. यश मिळवेल तो नेता आणि चार जाणांचे सल्ले ऐकत बसून वेळ घालवून नंतर पश्चाताप होतो तो मावळता नेता किंवा उदयापूर्वी अस्ताला जाणारा फाजील कार्यकर्ता म्हणावा लागेल. म्हणून आयुष्यात नेता व्हायचं असेल तर पुढाकार घ्यायला शिका तशी तयारी करा. जेवढा मोठा पुढाकार घेण्याची ताकद दाखवताल तेवढी मोठी नेतृत्वाची संधी लोक तुम्हाला देत राहतील. लक्षात ठेवा संधीने तुमचे दार ठोकावे असे वाटत असेल तर आधी दरवाजा तयार करा आणि तो संधी मिळविण्यासाठी सताड उघडा देखील ठेवा. हा संधीचा दरवाजा तुमची पुढाकार घेण्याची प्रवृत्ती, मानसिकता इच्छा होय.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
