जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

४. Innovative : नावीन्यता

शिवाजी महाराजांच्या नाविन्यतेचा विचार थोडक्यात करुन बघू. जगात पहिल्यांदा वाघनखांचा वापर करण्याचा विक्रम महाराजांच्या नावावर आहे. १६ व्या शतकात आग, धूर, प्रकाश, ध्वनी यांचा संदेशवहनासाठी उपयोग करुन संदेशवहन क्षेत्रात क्रांती करण्याचा मान महाराजांकडे जातो. या देशात पहिले आरमार बांधण्याचे स्वदेशी आरमार उभे करण्याचे श्रेय महाराजांकडे आहे. खास मराठ्यांच्या शारिरिक बौद्धीक क्षमतेचा अभ्यास करुन महाराजांनी नवीन हत्यारे बनवून घेतली. उदा. मराठ्यांची सरळ तलवार पट्टा आणि विटा ही तीन हत्यार महाराजांच्या कल्पनेतून जन्माला आलेली कोणत्याही हिंदू राजाने धर्म भितीमुळे समुद्रप्रवास करणं टाळलं. ही
वस्तुस्थिती असताना महाराजांनी आपल्या सोबत ५००० मावळ्यांना घेऊन कारवारची पहिली समुद्री मोहीम काढली.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!