जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
5.Self confidence: आत्मविश्वास
शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे होते. कुठले देव अवतारी नव्हते मग ते एवढे मोठे कशाच्या जीवावर झाले तर ते एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे आत्मविश्वास, लक्षात ठेवा कितीही संकटे येवोत कितीही वादळ येवोत कितीही निंदा होवो तुम्ही स्थितप्रज्ञ व्हा आत्मविश्वास ढळू देऊ नका. आपल्या नेतृत्वाचा सूर्य कर्तृत्वाच्या क्षितीजावर तळपवायचा असेल तर आत्मविश्वास रुपी सूर्यमाला डळमळीत होऊ देऊ नका. वाटेल ते कष्ट उपसा वाटेल ती किंमत मोजा परंतु आपल्या धैर्यापासून ध्येयापासून ढळू नका. एकवेळ आपण संपलो तरी हरकत
नाही पण आत्मविश्वास ढळू देऊ नका. कारण आत्मविश्वास हाच प्राण आणि नेत्याचा आत्मा होय, तो गमावल्यावर जीवन ते कसले. थांबू नका. मागे वळून पाहण्यात वेळ घालवू नका. सदैव पुढे जात रहा. महाराजांनी पहा आपल्या आयुष्यात किती संकटे आली तरी स्वराज्याचा निर्धार सोडला नाही. नोकरीच्या मनसबदारीच्या अनेक संधी असताना स्वराज्याचा निश्चय सोडला नाही आणि म्हणूनच ते मान्यता पावले. कारण आत्मविश्वास ढळला नाही. आम्हीही आपला आत्मविश्वास अढळ ठेवूया. यशस्वी नेता होऊया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
