११. Discipline शिस्त
छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं नाव म्हणजे शिस्त. शिस्त एवढी करडी की राजपुत्रच काय पण सेनापती किंवा मंत्री ती मोडण्याची हिंमत करु शकत नव्हता. नेताजी पालकरांना काही कारणास्तव ठरलेल्या वेळी यायला उशीर झाला काय केलं महाराजांनी मेमो नाही, दम नाही, रिमायंडर नाही थेट बडतर्फ केल्याचा आदेश दिला गेला. शामराज निलकंठ पेशवा होता त्याने एका कामात लाचखोरी केली पहिल्याच तक्रारीत बडतर्फी आणि याचं दुसरं रुप म्हणजे जो-जो शिस्तपालन करी त्याला बढती दिली जाई. प्रतापराव गुजर नेसरींच्या खिंडीत मारले गेले. हंसाजी मोहितेने लगेच फौज सावरुन बहलोलचा पार त्याच्या गावापर्यंत पाठलाग केला आणि त्याचवेळी महाराजांना पत्र दिले. प्रतापराव पडले आम्ही आहोत काळजी नसावी. आणि तसेच करुन दाखविले. परिणाम पुढच्या काही दिवसातच महाराजांनी हंसाजी मोहीतेंना हंबीरराव ही पदवी देऊन स्वराज्याचे सरसेनापती पद दिले. शिस्तप्रिय माणूस यशाकडे जातो आणि बेशिस्त माणूस आपोआप अपयशाकडे जातो. थोडक्यात शिस्त पाळणे म्हणजे काय तर नियम कायदे पाळा. आणि सगळ्यात महत्वाचं दिलेला वेळ शब्द पाळा. शब्द पाळणारा जग पाळू शकतो आणि शब्द न पाळणारा जगात कायम तोंड लपवून पळत राहतो. काय करायचे ते आपण ठरवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
