जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१२. Patience : संयम

काही राज्यात तुम्हाला नेता व्हायचे असेल तर जातीचा आधार घ्यावाच लागेल. उदा. पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार तर काही ठिकाणी तुम्हाला प्रांतवादाचा मुद्दा मातालून नेता होता येईल किंवा एखाद्या जातीचे तारणहार व्हा आणि यातील कोणताही मुरा शिल्लक नसेल तर मग भाषांवर प्रांतरचना कशासाठी केली गेली आहे, प्रत्येक प्रांतातील नेता होऊ इच्छीणाराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच.

आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा भारतात महाराष्ट्रात तुम्हाला नेता व्हायचं असेल तर तुम्हाला कायम सुवर्णसंधी आहे. या देशात तुम्हाला कोणतीही शैक्षणिक पदवी घेणं बंधनकारक नाही. तुम्ही अगदी अडाणी असताल तरी मुख्यमंत्री होऊ शकता. पण इथे वशीला मात्र तयार ठेवा. तुम्हाला कोणाचा तरी मुलगा मुलगी, जावई, व्हावं लागेल. शिष्यांना मुख्यमंत्री करण्याचा शिरस्ता नसला तरी नाराज होऊ नका. किमान मंत्री तरी होताल ना पुढचं पुढं पाहू, मंत्री पदापर्यंत पोहोचल्यावर मुख्यमंत्री व्हायला किती वेळ लागतो. संयम ठेवा, सातत्य ठेवा. तुम्ही आज ना उद्या यशस्वी नेता होणारच, फक्त एक गोष्ट नक्की करा. तुमची स्टाईल जगावेगळी अशी ठेवा. कोणाची कॉपी करुन अनुयायी होता येत नेता होण्यासाठी नवीनच रुप धारण करावं लागतं. आणि हो या देशात सर्वात मोठा नेता व्हायची हौस असेल तर शिमग्याची सोंग घ्यायला शिका. लोकांनी कितीही नावानं बोंब मारली तरी त्यांच्यावर भडकू नका. संयम ठेवा कारण हेच पाच वर्ष शिव्या शाप देणारे शेवटच्या दिवशी तुम्हालाच मतदान करणार असतात. त्याची मतं कशाने मिळतात हे तुम्हाला माहित असतं. म्हणून त्यांना बोंबलू द्या आपण आपलं नेतागिरी सोडायचं अजिबात काम नाही. अरे हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार म्हणून हत्तीने काय बाजारात चालणं सोडाव अजिबात नाही. कुत्रे जर भुंकायचे सोडत नसतील तर तुम्ही तरी आपली चाल कशासाठी बदलायची किंवा थांबवायची. तर चला चालत राहूया आणि नेतृत्व करण्याच्या विविध पद्धती स्टाईलस पाहूया.

“नेता म्हणजे अशी व्यक्ती जीला मार्ग माहीत असतो

त्यावरुन स्वतः चालायची तयारी असते

आणि जी इतरांनाही मार्ग दाखविते.” जॉन सी मॅक्सवेल

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!