जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

२. Intelligenece बुद्धिमत्ता

बुद्धीमता हा विषय शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणाल तर जगाला आश्चर्यचकीत करणारे त्याचवेळी शत्रूची अक्कल गुंग करणारे महाराज जागतिक पातळीवर बुद्धीवानांच्या शिरोभागी असल्याचे आपणाला पहायला मिळते. महाराजांचा एक एक पराक्रम आणि धाडस एवढे मोठे आहेत की जे पाहून कधीच कोणा सरसेनापतीला किंवा मंत्र्याला महाराजासमोर बढाई मारावी किंवा महाराजांना शहाणपणाचा सल्ला द्यावा अशी कधीच संधी मिळाली नाही कारण महाराज स्वतः इतरांना जे जमणार नाही ती कामे स्वतःच्या हाती घेत अगदी उदाहरणानुसार पाहूया. वयाच्या १८ व्या वर्षी फतेखानाला महाराज स्वतः सामोरे गेले.

अफजल खानाला भेटायला कोणी सेनापती वा मंत्री न पाठवता स्वतः भिडले. शाहिस्तेखानावर छापा टाकायला दुसऱ्यांना पुढे न करता स्वतः लालमहालात घुसले, आग्र्याला इतरांना न पाठविता स्वतः गेले आणि दक्षिण दिग्वीजय ते सुरत मोहीम बुऱ्हाणपूर, कारंजा, कारवार, राजापूर अशा अनेक मोहीमा स्वतः केल्या आणि जगाला आपल्या बुद्धीमतेची चमक दाखवून दिली. महाराजांची बुद्धिमता पर्यायाने पराक्रम एवढ्या कुतुहलाचे विषय होऊन बसले की युरोपियन लोकांना महाराजांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, सिजर, हॉनिबॉल, सेटोरियस अशा नावाजलेल्या लोकांशीच करावी लागली.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!