Decision is not when you don’t have option, decision is when you have to make a better choice as what you have to do.
प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंदाला आपणाला जीवनात, व्यवस्थापनात खाजगी, सार्वजनिक जीवनात निर्णय हे घ्यावेच लागतात. म्हणून निर्णय कसा घेतला जाती है आपणाला माहीत असलेच पाहिजे. तर पाहुया निर्णय म्हणजे काय आणि तो योग्य पद्धतीने कसा घेतला जातो. फ्लाउट जॉर्ज व्यवस्थापन तज्ञाने केलेली निर्णयाची व्याख्या पहा किती बोलकी आहे.
“In the final analysis managers are paid for doing only one thing i.e making decisions. In fact the job of Managing is the job of making decisions.”
या व्याख्येचा अर्थ असा जेव्हा विश्लेषण केले गेले की व्यवस्थापकाला पगार कशासाठी दिला जातो तर त्याचे उत्तर मिळाले फक्त एकाच कामासाठी आणि ते म्हणजे निर्णय घेणे. म्हणजेच काय तर व्यवस्थापन करणे म्हणजेच निर्णय घेण्याचं काम करणे होय. आता निर्णय घेणं म्हणजे काय तर सोप्या भाषेत पहा. निर्णय घेणं म्हणजे आपल्याकडे असलेल्या परवडणाऱ्या पर्यायापैकी एक योग्य पर्याय निवड करण्याची कला किंवा प्रक्रिया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
