निर्णय घेणे म्हणजे काय ?

निर्णय घेणे

 

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात दररोज एक गोष्ट करावीच लागते आणि ती म्हणजे निर्णय घेणे. निर्णय घेणं यासाठी महत्वाचं आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे ठरविणे आवश्यक आहे. ज्याला आयुष्यात निर्णयच घेता येत नाही त्याचा निर्णय आयुष्यच घेत. काहीच निर्णय न घेता तो घेण्याचे टाळण्याचा प्रयत्न करणाराचा निकाल एकदाच लागतो. त्यांना अपिल करायची संधी नियती देत नसते. जे लोक योग्य निर्णय घेतात त्यांना नियती पुढे निर्णय घेण्याची संधी देत असते.

निर्णय घेण्याच्या प्रसंगी आपण बहुधा गोंधळात पडतो आणि काहीतरी निर्णय घ्यायचा किंवा एकदाचा घेऊन टाकू निर्णय असं म्हणून निर्णय घेतला तर तो चुकणारच ना! अधाशीपणे हताशपणे आपण घेतो तो निर्णय नसतो ती असते अपरिहायर्ता.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!