८. Neurocratic style
नेतृत्व करण्याची ही पद्धत म्हणजे ध्येयवादी नेत्याचा प्राण आहे. एखादे काम ठरविले की ते कोणतीही किंमत मोजून कितीही कष्ट पडले तरी करायचेच ही मानसिकता या नेत्याची असते. हा नेता Task oriented असतो. तो कामालाच प्राधान्य देतो. खुषमस्करे आणि हौसे गौसे याच्या आजुबाजूला फिरकण्याची सुद्धा हिंमत करणार नाहीत. हा नेता अतिशय करारी असतो. हा नेता अत्यंत संवेदनशील असतो आणि तोच छोट्या छोट्या गोष्टीचीही चांगली दखल घेतो. त्यामुळे अपयशाची थोडी जरी शंका आली तरी तो सावध होतो आणि त्याप्रमाणे लगेच कामाला लागतो. बऱ्याचदा हा नेता इतरांवर तेवढा विश्वास टाकत नसल्यामुळे एशाच्या भावनेतून पछाडलेला राहू शकतो.
न्यूरोक्रॅट स्वरुपाचा नेता हा कधी कधी भावनिक सुद्धा होतो. आणि त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वभाव अतर्क्स असतो. तो केव्हा काय मनात आणील आणि कोणत्या कामाला लोकांना जुंपेल यांचा काही नेम नसतो आणि म्हणून तसे काम सुरु करताना सहकाऱ्यांना या बाबतीत विचार विनिमय करायला बोलावेल किंवा सहभागी करेल ही शक्यता बरीच लांब राहते.
आणि त्यामुळे निर्णय घेताना हा नेता स्वतः एकट्यानेच होतो आणि बरं तो निर्णय बरोबर ठरला तर श्रेय स्वतः घेतो आणि निर्णय फसला तर त्याचे खापर सहकाऱ्यावर फोडू शकतो. फिडेल कॅस्ट्रो, हिटलर, मुसोलिनी, नेपोलियन, सद्दाम हुसैन, गडाफी ही उदाहरणे आठवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
