माझी भाग्यलक्ष्मी : सौ. सुनंदा
सुनंदाला मी सुखी संसाराचे चित्र रंगवून सांगायचो, ती तेवढचात समाधानी व्हायची व आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायची. आमचा संसार असा काही काडी करूनच चालला होता.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा भरभक्कम हात असतो, असे नेहमीच म्हटले जाते. मी स्वतः याची प्रचिती घेतली आहे. सुनंदाच्या रूपाने मला अशी सहचारिणी मिळाली. सुनंदाचे माहेर तसे आमच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत सुबत्ता असलेले. माझे सासरे कृषीविभागात बडे अधिकारी होते. ते त्याकाळी नगर शहरात नालेगाव येथे वास्तव्यास होते. त्यांना चार चार मुली व एक मुलगा, सुनंदा सगळ्यात थोरली. तिचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. मुलींनी आणखी शिकावे, अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. परंतु परंतु आजोबांनी मॅट्रिकनंतर लगेचच तिचे लग्न आटोपण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमचे स्थळ त्यांना पसंत पडले व पुढे आम्ही विवाहबंधनात अडकलो. सुनंदाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षणही घेतले. चांगल्या सुखवस्तू कुटुंबातील सुनंदाला घरातील कामे, स्वयंपाक वगैरे अशा कामांची सवय नव्हती. मॅट्रिकनंतर लगेचच लग्न झाल्याने तिला ते शिकण्यासाठी तसा वेळही मिळाला नाही. माझे सासू-सासरे कडक शिस्तीचे होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व मुलांना चांगले वळण व शिस्त लावली होती. काटकसरीचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले. तिच्यातील या गुणांचा आमच्या संसाराता खूप उपयोग झाला. आमचे लग्न झाले, तेव्हा काही दिवस ती आमच्या गावी म्हणजे सासरी राहिली. तिला स्वयंपाक वगैरे अशी कामे येत नव्हती. माझ्या आईने तिच्याकडून ही कामे करवून घेतली. आमची आई पारंपरिक विचारांची असल्याने बाईला घरातील कामे यायलाच हवीत, यावर तिचा भर असायचा.
सुमारे महिनाभर मांडव्याला राहिल्यानंतर मी तिला औरंगाबादला नेले व आमचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यावेळी माझा लहान भाऊ विक्रमही माझ्याकडेच शिकायला होता. आमचे औरंगाबादचे घर म्हणजे दहा बाय दहा आकाराची एक छोटीशी खोली. तीही भाड्याची. लग्नात मिळालेल्या रुखवतापैकी आम्ही फक्त एक लोखंडी कॉट व एक कपाट आणि आवश्यक तितकी भांडीकुंडी एवढेच त्या लहान खोलीत कसेबसे बसविले. त्या काळात माझी नोकरीही नवीनच होती. मला पगार यायचा, परंतु त्या पैशातून मी गावाकडे शेतीवाडी सुधारण्यासाठी गुंतवणूक करीत होतो. आपण नोकरीला लागलो आहोत, तर घरची परिस्थितीही सुधारली पाहिजे, अशी माझी धारणा होती. खरे तर मला मिळणाऱ्या पगारात मला मोठे घर भाड्याने घेणे सहज शक्य होते. पण मी सर्वांत पहिले प्राधान्य माझ्या गावाकडच्या घराला दिले. सुनंदानेही कोणतीही कुरकुर न करता मला या काळात साथ दिली. छोट्याशा खोलीतच तिने आपला संसार व्यवस्थित चालविला. आमच्या घरमालकाची पत्नी होती, तिच्याशी तिने मैत्री जमवली. त्यांच्याकडून ती स्वयंपाक वगैरे संसारातल्या गोष्टी शिकली. माझे व माझ्या भावाचे सगळे व्यवस्थित करायची. कधी कधी ती मोठे घर हवे, असे बोलूनही दाखवायची.
मी तिला ‘थोडी कळ काढ’ असे सांगायचो. “भविष्यात आज आपली खोली जितकी आहे, तितक्या आकाराचं बाथरूम असलेला बंगलाआपण बांधूः” असे मी तित्य म्हणायचो. असे एकूण सुखी संसाराचे चित्र तिला रंगवून सांगायचो. ती तेवख्वात समाधानी व्हायची व आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायची आमचा संसार असा काही काही करूनच चालला प्रचंड स्वाभिमानी असल्याने तिने स्वतःच्या संसारासाठी कोणाकडे आशेने पाहिले नाही. आमच्या संसारवेलीवर १२ जुलै १९८४ रोजी पहिल्या मुलाचा जन्म झाला. आम्ही या पहिल्या मुलाचे नावं ‘संदीप’ ठेवलं, मला सुरुवातीपासून क्रिकेटची प्रचंड आवड त्या काळी संदीप पाटील हा क्रिकेटमधील तडाखेबंद फलंदाज म्हणून प्रसिद्ध होता. त्याचे एकूण व्यक्तिमत्वन रुवाचदार होते. मी स्वतः त्याचा चाहता होतो. त्यामुळे पहिला मुलगा झाल्यावर मी त्याचे नावही संदीप ठेवले संदीप तहान असताना आम्ही माडीवरच्या खोलीत राहायचो. त्यावेळी त्याला सांभाळणे व घरातील नित्य कामे करताना सुनंदाला खूप कसरत करावी लागे, पण ती सगळ्या गोष्टी आनंदाने करायची. १९८५ ला मी दुसरीकडे दोन खोल्यांचे घर घेतले. अर्थात तेही भाजपानेच होते. परंतु जरा मोठ्या घरात आल्याने सुनंदाची कळी खुलली होती. आम्ही तिथे साधारण एक वर्ष राहिलो.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
