यशाचे गुपित

यशाचे गुपित

मैत्री जपा, यशस्वी व्हा

मैत्री हे रक्ताचे नाते नसले, तरी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे व महत्त्वाचे असते. म्हणून ते कायम जपले पाहिजे. कारण या नात्यात स्वार्थ नसतो. मानापमान नसतो. मैत्रीत जातपात, धर्म, संपत्ती अशा गोष्टी आड येत नाहीत. नात्याला मर्यादा असतात, मैत्रीत तसे काही नसते. महणूनच श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीचे आजही नाव घेतले जाते. रक्ताच्या नात्यांमध्ये अपेक्षांचे ओझे असते, नातेवाईक विचार करतात की, ‘हा किती वेळा माझ्या कामाला आला? किती वेळा त्याने मला मदत केली?’ नात्यामध्ये ईर्षा, असूया असते. मैत्रीमध्ये असते फक्त प्रेम व विश्वास माझ्या आयुष्यात मला अनेक जिवाभावाचे मित्र मिळाले. अगदी माझ्या गावापासून तर नेट परदेशांतही मी मैत्रीचे सेतू बांधले आहेत. दुबईमध्ये प्रशांत पेटकरजी नावाचे माझे एक चांगले मित्र आहेत. मित्रांमुळेच मी माझ्या व्यवसायात यशस्वी होऊ शकलो, हे सांगताना मला अभिमान वाटतो. कारण मला जे प्रेम, प्रोत्साहन मिळाले, ते ९५ टक्के मित्रत्वामुळेच मिळाले. उरलेले ५ टक्के नातेवाइकांकडून, त्यामुळे मैत्री कायम जपली पाहिजे. ती तुम्हाला यशाच्या दिशेने नेते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!