यशाचे गुपित
स्वयंप्रेरित, स्वयंप्रकाशित बना
मोठ्या यशासाठी स्वयंप्रेरित बना. ज्यांना मोठे यश मिळाले आहे, ते अशाच प्रेरणेतून मोठे झालेत. बाहेरच्या प्रेरणेमुळे तुम्ही दोन-चार दिवस प्रभावित रहाल. काही काळ गेल्यानंतर बॅटरी डिस्चार्ज झाल्याप्रमाणे तुमच्या मनातील ती बाह्य प्रेरणाही ओसरेल. यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते, जी तुमची बॅटरी कायम चार्ज ठेवेल. इतरांचा प्रकाश तुम्हाला फार काळ उजेड दाखविणार नाही, तुम्हाल स्वयंप्रकाशितच व्हावे लागेल.
एकदा एक आंधळी व्यक्ती आपल्या डोळस मित्राकडे गेली. गप्पा मारताना रात्र कधी झाली, ते दोघांना कळलेच नाही. अंध व्यक्ती घरी जायला निघाली, तेव्हा मित्राने त्या व्यक्तीच्या हातात एक कंदील दिला. अंघ मित्र म्हणाला, “अरे, मला कंदिलाचा काय उपयोग? मला दिवस व रात्र सारखीच.” मित्र म्हणाला, “हा कंदील तुझ्यासाठी नाही, तर इतर डोळस लोकांसाठी आहे. कंदिलाच्या उजेडामुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांना कळेल को, कोणी तरी येतंय, आपण बाजूला झालं पाहिजे.” अंध मित्र ‘ठीक आहे,’ म्हणाला व कंदील घेऊन निघाला. घोडे अंतर कापल्यानंतर अचानक एक व्यक्ती अंध व्यक्तीला येऊन धडकली. अंध व्यक्ती आश्चयनि म्हणाली, “अरे, तुला माझ्या हातातला कंदील दिसला नाही का? डोळस आहेस ना तू?” त्यावर ती व्यक्ती उत्तरली, “अरे, कंदील बंद आहे, मला कसा दिसेल तो?”
त्यावर अंध व्यक्ती स्वतःशीच हसली. कंदील विझून गेलेला त्याला माहितीच नव्हते. तो मनाशीच म्हणाला, ‘उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही. त्यासाठी स्वयंप्रकाशित असणेच गरजेचे आहे.’ गौतम बुद्धांनी यासाठीच म्हटले आहे, ‘अत्त दीप भव’, म्हणजे स्वयंप्रकाशित, स्वयंप्रेरित व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
