वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंग : एक परस्परपूरक नाते!

वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसे एखाद्या वृक्षाची मुळे त्याला आधार देतात, त्याचप्रमाणे आपली ओळख तयार करण्यामध्ये वैयक्तिक ब्रँडिंगचा सहभाग असतो, तर ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी नेटवर्किंगची भूमिका महत्त्वाची असते. वैयक्तिक ब्रँडिंगच्या माध्यमातून आपण आपले मूल्य, आपली ताकद आणि आपल्या व्यवसायाच्या संकल्पना इतरांपर्यंत पोहोचवतो. हे एक प्रकारचे साध्य आहे, जिथे आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडतो.

वैयक्तिक ब्रँडिंगमुळे आपण समोरच्या व्यक्तीला एक विशिष्ट अनुभव देतो : एखादा आपल्याला समजून घेतो, आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या मूल्यांशी एकरूप होतो. नेटवर्किंगद्वारे आपले हे मूल्य लोकांपर्यंत पोहोचते. आपण आपल्या ओळखीची रुंदी वाढवू शकतो, नवी नाती निर्माण करू शकतो आणि त्यामधून आपली ओळख अधिक दृढ करू शकतो.

एक सकारात्मक दृष्टिकोन, आपल्या व्यवसायाबद्दल प्रामाणिकता, सहकार्याची वृत्ती आणि सेवा करण्याची सिद्धता दाखवून आपण लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण करतो. त्याचबरोबर नेटवर्किंग हे एक सहकार्याचे व्यासपीठ असते. येथे आपण परस्परांना ऊर्जा देतो, परस्परांच्या यशात खरेखुरे योगदान देतो.

यामधूनच एक सशक्त आणि दीर्घकालीन नाते निर्माण होते. आपण जेव्हा आपल्या व्यवसायाबद्दल विचार करत असतो, तेव्हा तो व्यवसाय केवळ एक सेवा देण्याचे साधन न राहता, आपली एक ओळख निर्माण करणारा एक आधार बनतो. आपल्याला फक्त आपला व्यवसाय वाढवायचा नसतो, तर एक अशी ओळख निर्माण करायची असते जी आपल्या अस्तित्वाला, आपल्या मूल्यांना कायमस्वरूपी टिकवून ठेवेल.

लेखक- ब्रँडबाँड निलेश बी
(लेखक डिझायनर, कोच आणि ब्रँड सल्लागार असून त्यांनी ‘उद्योगऊर्जा’ या फोरमचे संस्थापक आहेत. त्यांनी ब्रँडिंग या विषयावर ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.)
संपर्क : 8879230443

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!