वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र
बिझनेस नेटवर्किंगमुळे होणारे फायदे
नेटवर्किंग हे केवळ व्यवसायाच्या प्रमोशनसाठी नसते, तर त्यातून विश्वासाचे नाते निर्माण होऊन व्यवसायवृद्धीला चालना मिळते. नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण इतरांना आपले आणि आपल्या व्यवसायाचे महत्त्व पटवून देऊ शकतो. काही महत्त्वाचे फायदे :
- विस्तारित ओळख : नियमित नेटवर्किंग मिटींग्समुळे व्यवसायाची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते.
- बिझनेस कार्ड्सची देवाणघेवाण : बिझनेस कार्ड्सद्वारे आपण इतरांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकतो.
- सादरीकरणाच्या संधी : नेटवर्किंगमध्ये एक मिनिटे किंवा दहा मिनिट सादरीकरण करताना, आपली ओळख प्रभावी पद्धतीने मांडता येते.
- प्रत्यक्ष भेटींच्या संधी : इतर व्यावसायिकांना १-२-१ भेटण्याची संधी मिळते, ज्यामुळे आपले नाते अधिक दृढ होते.
- विश्वासार्हता वाढवणे : परस्पर विश्वासाचे नाते निर्माण होऊन आपला ब्रँड अधिक विश्वासार्ह बनतो.
- व्यावसायिक मैत्री : नेटवर्किंगमुळे व्यवसायातील इतर व्यावसायिकांशी घनिष्ठ मैत्री होते.
- शिकण्याची संधी : विविध उद्योजकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
- प्रोत्साहन व प्रेरणा : इतर व्यावसायिकांचे ज्ञान, अनुभव आणि यशातून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते.
- सहकार्य आणि एकत्र काम : एकत्र काम करण्याच्या मानसिकतेमुळे व्यावसायिक सहकार्य वाढते.
- मुल्यवर्धित नातेसंबंध : इतर व्यवसायांशी केलेली सहकार्यपूर्ण ओळख आपल्या व्यवसायाला व वैयक्तिक ब्रँडला बळ देते.
अशा पद्धतीने नेटवर्किंगच्या माध्यमातून केवळ व्यवसायवृद्धी होत नाही, तर आपल्या वैयक्तिक ओळखीला एक विशिष्ट विश्वास, आदर आणि प्रतिष्ठा मिळते. या ओळखीतूनच व्यवसायात यशाची नवी क्षीतिजे खुली होतात आणि आपला सेल्फ ब्रँड दीर्घकाळासाठी स्थिर होतो.
आपल्या परस्पर नातेसंबंधातून एक ऊर्जा निर्माण होते, एक विश्वासाची भावना निर्माण होते; जी आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाते. म्हणूनच आपली आगळीवेगळी सेल्फ इमेज तयार करण्यासाठी, फुलवण्यासाठी आणि सतत वाढवत नेण्यासाठी बिझनेस नेटवर्किंगला आपल्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनवा.
लेखक- ब्रँडबाँड निलेश बी
(लेखक डिझायनर, कोच आणि ब्रँड सल्लागार असून त्यांनी ‘उद्योगऊर्जा’ या फोरमचे संस्थापक आहेत. त्यांनी ब्रँडिंग या विषयावर ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.)
संपर्क : 8879230443
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
