श्रीमंत होण्याची इच्छा असणाऱ्यांचा धर्मग्रंथ!

श्रीमंत होण्याची इच्छा असणाऱ्यांचा धर्मग्रंथ…!

 

पैसा महत्वाचा नाही, पैसा कमवल्यावर कळतं की पैसा म्हणजे सुख नाहीच…अशी अनेक वाक्यं आपल्याकडे प्रचलित आहेत. अनेक लोक असे उपदेश करतात देखील. परंतु इतकं असूनही जग अजूनतरी पैश्यांवरच चालतं आणि – पैसा म्हणजे सुख नव्हे हे खिश्यात बक्कळ पैसा असल्यावरच म्हणावं – हे सर्वांना नक्कीच ठाऊक आहे.

म्हणूनच श्रीमंत होण्याची धडपड सर्वांचीच सुरूच असते. या धडपडीत कायमस्वरूपी दिशादर्शक ठरेल असं पुस्तक म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक.

ही कहाणी आहे, रॉबर्टच्या दोन वडिलांची. एक श्रीमंत वडील, एक गरीब. रॉबर्ट म्हणतात – माझे खरे वडील गरीब होते. सर्वसाधारण गरीब/माध्यम वर्गीय माणूस जसा विचार करतो, जसं वर्तन करतो त्यानुसारच जगत होते. आणि म्हणून ते कधीच श्रीमंत झाले नाही. उलट, माझ्या मित्राचे वडील (– ज्यांना रॉबर्ट आपले “श्रीमंत वडील” म्हणतो –) मात्र वेगळाच विचार करायचे. पैसा कसा “वागतो”, पैश्याने पैसे कसे उभारता येतात याचा विचार करत आणि त्यानुसार कृती करत जगत होते. म्हणून ते अधिकाधिक श्रीमंत होत गेले.

रॉबर्टच्या वडिलांनी त्यांना दिलेले धडे – म्हणजे हे पुस्तक!

रिच डॅड पुअर डॅडचा सार २ मूलभूत तत्वांमध्ये सामावला आहे.

१ – श्रीमंत लोक पैश्यासाठी स्वतः काम करत नाहीत. ते पैश्यांना स्वतःसाठी काम करायला लावतात.

२ – श्रीमंत होण्यासाठी “मोठं उत्पन्न” असावंच लागतं – असं अजिबात नाही.

या दोन गोष्टीच अनेकांसाठी धक्कादायक असतात. नवा विचार असतात. हे २ तत्व समजून घेणं, पटवून घेणं सुरुवातील जड जातं. पण रॉबर्ट यांची समृद्ध अनुभवांवर आधारित लेखणी वाचकांना भरकटू देत नाही. पुढे पुढे रॉबर्ट कडून येणारा हा आर्थिक कॉमन सेन्स आपली पकड घेतो.
परिणाम हा होतो – की हे पुस्तक संपेपर्यंत आपली पैश्यांकडे बघण्याची दृष्टी कायमची बदलून जाते.

या पुस्तकाचा मूळ हेतू जगात अर्थ साक्षरता वाढवणं हाच आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचं असतं खरं, पण श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय, आपण नेमकं “कधी” श्रीमंत होतो, ते होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे उत्पन्न वाढवत न्यावं लागणार आहे अश्या अ-ब-क-ड पासून आर्थिक मूळाक्षरं रॉबर्ट गिरवून घेतात.

रॉबर्ट म्हणतात उत्पन्न ३ प्रकारचं असतं. प्रत्यक्ष कामातून मिळवलेलं – अॅक्टीव्ह उत्पन्न, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परतव्यातून मिळणारं – पोर्टफोलियो उत्पन्न आणि स्वतः काम नं करता, पैश्याला कामाला लावून मिळवलेलं अप्रत्यक्ष – पॅसिव्ह उत्पन्न. श्रीमंत होण्यासाठी या तिन्ही उत्पन्नांचा मिलाफ घडवून आणायचा असतो. त्याचा रोडमॅप रॉबर्ट आखून देतात.

पुस्तकातून ४ मोठे “थिंकिंग शिफ्ट” घडवून आणले जातात.

१ – तुम्ही किती पैसे कमावता याहून तुम्ही किती पैसे वाचवू शकता हे कितीतरी जास्त महत्वाचं असतं.

२ – श्रीमंत लोक नेहेमी मालमत्ता (assets) विकत घेतात, गरीब लोक नेहेमी जबाबदऱ्या (liabilities) विकत घेतात. बहुतेक गरिबांना दोन्हीतील फरक कळतच नाही – तिथेच गडबड होते.

स्वतःला वापरण्यासाठी घेतलेली कार अनेकांना asset वाटते, पण ती liability असते – कारण या कारमधून कोणतं ही उत्पन्न मिळत नाही. परंतु हीच कार व्यवसायाच्या कामासाठी वापरली जात असेल आणि इतर साधानांच्या ऐवजी ही कार वापरल्याने व्यवसायात अधिक लाभ होते असेल – तर ती asset असते. श्रीमंत लोक अश्याच assets घेत जातात. म्हणून त्यांचं उत्पन्न वाढत जातं, ऐश्वर्य वृद्धिंगत होत रहातं.

३ – पैसे कमावणं ठीकच – पण कमवलेले पैसे कसे वापरायचे, कुठे वळवायचे, कसे वाढवायचे – हे कळण्यासाठी आर्थिक कौशल्य (financial aptitude) आत्मसात करणं अत्यंत आवश्यक असतं.

४ – आपल्याकडे असणारी सर्वात मौल्यवान मालमत्ता, asset म्हणजे – आपली बुद्धी. ती अधिकाधिक वापरत, अधिकाधिक तीक्ष्ण करत रहाणे – हीच श्रीमंत होण्यासाठीची मूलभूत अट आहे.

अश्याच अनेक खरोखर लाईफ चेंजिंग लेसन्ससाठी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक सर्वार्थाने श्रीमंत लोकांसाठी धर्मग्रंथच ठरतं!

सेवाह तर्फे होणाऱ्या सायन्स अँड सक्सेस या कोर्समद्धे रॉबर्ट कियोसाकींनी शिकवलेले सर्व धडे गिरवले जातात. फक्त धडे गिरवणेच नव्हे, तर वेळोवेळी फॉलो-अप घेऊन, इतर मेंबर्स आणि सेवाह टीम यांच्या साथीने बडी – मेंटर अशी शिस्तबद्ध आखणी करून हे धडे कृतीत उतरवले जातात. हेच कारण आहे, ज्यामुळे शेकडो मध्यमवर्गीय उद्योजक आज आर्थिक स्वातंत्र्य मिळवून तणाव रहित जीवन जगत आहेत. स्वतंत्र जीवन जगत आहेत.

error: Content is protected !!