सुशिक्षित शिवाजी महाराज

  सुशिक्षित शिवाजी महाराज

जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, “मध्ययुगीन भारतातील अकबर, हैदरअली आणि रंजीतसिंह या पुरुषांप्रमाणेच शिवाजी देखील निरक्षर होता असाच पुराव्याचा कल आहे. शिवाजीला जे अनेक युरोपीय भेटले त्यांनी त्याला काही लिहिताना कधीच पाहिले नाही. जेव्हा त्यांनी राजांकडे काही अर्ज सादर केला तेव्हा त्यांनी तो वाचून दाखविण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्याकडे दिला. शिवाजीच्या हस्ताक्षरातला कोणताही मजकूर उपलब्ध असल्याचे ज्ञात नाही. (शिवाजी अॅण्ड हिज टाइम्स पान नं. २५)

एवढेच म्हणून जदुनाथ सरकार थांबलेले नाही तर त्यांनी पुन्हा पुन्हा शिवाजी महाराज निरक्षर असल्याचे म्हटले आहे. आता जदुनाथ सरकार आणि ग्रँट डफ हे इतिहासात कशी हरामखोरी करतात याची जरा पोट फाडून चिकित्सा करावी लागेल.

शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी शिक्षणाची जी व्यवस्था केली होती त्याचा उल्लेख शिवभारतात आलेला आहे. “मग तो गुणवान मुलगा ७ वर्षाचा झालेला पाहून हा लिपी शिकण्यास योग्य झालेला आहे असे शहाजी राजांना वाटले. त्यांनी त्या बुद्धीमान
स्पष्ट उच्चार करणाऱ्या मुलाला अधिकाऱ्यांच्या समवयस्क मुलांसह गुरुच्या मांडीवर बसविले. गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच तो दुसरे अक्षर सुद्धा लिहून ते दाखवित असे. सकल विद्यांचे द्वारच अशी जी लिपी ती सर्व गुरुने त्याला उत्तम रितीने शिकविली तेव्हा स्वभावतःच बुद्धीमान, सुस्वभावी व अवर्णनीय प्रवाहाच्या त्या राजबिंड्या छाव्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर लिपी शिकलेला पाहून गुरुला मोठा अभिमान वाटला. आणि हा विलक्षण (मुलगा) आहे, अशी त्याने खुणगाठ बांधली. (शिवभारत अध्याय ९, श्लोक ६०, ६१, ६२)

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!