१०६.पैसा नव्हे लक्ष्मी कमवा
असे म्हणतात, की Money is the largest god upon the sky. पैसा पैसा कंबख्त यह पैसा ख़ुदा तो नहीं। लेकीन ख़ुदासे कम भी नही। पैसा हा यशस्वी लोकांचा गुलाम असतो तर गरिबांचा मालक असतो. नीती, नियम व सिद्धांतांनी कमावले जाते ती लक्ष्मी असते व त्या लक्ष्मीसोबत सुख, शांती, आशीर्वाद, दुआ, शुभेच्छा मिळतील. त्यामुळे घरात व मनात सुख, शांती लाभेल. कारण त्या कमाईत पावित्र्य असते, शुद्धता, असते, नीती असते. जेथे नीती असते तेथे परमेश्वर पाठीराखा असतो. म्हणूनच श्रीकृष्ण पांडवाच्या बाजूने उभा राहिला. परंतु अनीतीने कमावलेला तो फक्त पैसाच असतो. त्या पैशासोबत शिव्याशाप, बददुआ, तळतळाटही मिळेल. त्यातून घरातील व मनातील शांती, समाधान गायब होईल. म्हणून पैसा नव्हे तर लक्ष्मी कमवा व सुख, शांती मिळवून यशस्वी जीवन जगा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
