१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?

३) ज्ञान- knowledge

शिवबाराजे या जगात फारच थोडे लोक असे असतात की जे ज्ञानासाठी काम करतात. अशा लोकांना अभ्यास करणे, संशोधन करणे, चिंतन मनन करणे आणि ज्ञान कमावणे यातच खरा आनंद वाटतो. अशी लोकं काम करतात ते फक्त ज्ञान मिळावे या हेतूने. या लोकांना पैसा, पद, सत्ता, वतन अशा कोणत्याही भौतिक गोष्टीत रस नसतो. राजे लक्षात ठेवा अशी ज्ञानासाठी काम करणारी माणसं हिच स्वराज्याची खरी संपत्ती होय. अशी लोकं आपण जपली पाहिजेत, जोपासली पाहिजेत आणि अशा लोकांचा प्रसंगी सांभाळ देखील केला पाहिजे.

अशी ज्ञानी आणि विद्वान माणसे ही तर राज्याच्या मुकुटातील मणीच होत. तेव्हा आपल्या राज्यात अशी जास्तीत जास्त माणसं येतील राहतील आणि आपल्या समाजाचे प्रबोधन करतील याची काळजी घ्या. अशा विद्वानांना राजाश्रय द्या. त्यांना काय हवं काय नको त्याची विचारपूस करत जा आणि त्यांचा सांभाळ करत जा.

राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराय यांना मोठा नजराणा पाठविला, परंतु ते निष्काम कर्मयोगी असल्याने त्यांनी तो परत केला. शिवाय स्वराज्याचे सैन्य कसे गोळा करावे, त्यांना काय शिकवावे याचे मार्गदर्शन करणारे १२ अभंग लिहून दिले. याला पाईकाचे अभंग असे म्हणतात. याचप्रकारे महाराजांनी कवी कलश, कवी भूषण, शाहीर अज्ञानदास मता बेगम, अशा कितीतरी लोकांना राजाश्रय दिला. अनेक विद्वानांना ग्रंथसंपदा लिहिण्याची प्रेरणा देऊन त्यांना मोठमोठी बक्षीसे दिली. शिवाय अशा लोकांची काळजी घेण्यासाठीच अष्टप्रधान मंडळात एक खास मंत्री नेमून दिला. याची जबाबदारी केवळ असे विद्वान आणि ज्ञानी माणसे यांना मदत करणे, प्रोत्साहन देणे या मंत्र्याचे नाव दानाध्यक्ष म्हणजे समाजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना देणगी देणारा मंत्री. यालाच आपण सध्या धर्मादाय आयुक्त असे म्हणतो आणि त्यांच्यातर्फे चालणाऱ्या कामांना दानधर्म म्हणजे charity.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

error: Content is protected !!