१८ यशाचा कानमंत्र

१८ यशाचा कानमंत्र

 

तुम्हाला मिळालेला अमूल्य वेळ वाया घालू नका. चौकातील सिग्नल काही सेकंदांचे असतात. तरीही काही महाभाग सिग्नल तोडतात. त्यामुळे त्यांना दोन पाचशे रुपयांचा दंड तरी लागतो, नसता अनमोल जीवन अपघाताने उद्ध्वस्त होऊ शकते. पण तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला म्हणाला चल तुला चहा भजे खाऊ घालतो, किंवा एखादी मैत्रीण म्हणाली चल मला चहा भजे खाऊ घाल. तर तुम्ही तास-दोन तास सहज वाया घालवताच ना! वेळेचे महत्त्व जाणा व जीवनात यशस्वी व्हा.

तुमचे ध्येय काय आहे? आणि तुम्ही काय बघता? हे महत्त्वाचं असते. महाभारतात सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनच का होता? कारण त्याला झाडावर लटकवलेल्या पक्षाचा डावा डोळाच दिसत होता. तुम्हालाही डावा डोळा दिसतो, पण कुणाचा? तिचा का? असे एकमेकांचे डोळे पाहून तुम्ही कधीही सर्वश्रेष्ठ बनणार नाहीत. तुम्हाला डोळेच पाहायचे असतील तर त्या मायबापाचे पहा. ज्यांनी काबाडकष्ट करून तुम्हाला शिकण्यासाठी पैसे देऊन आस लावून बसले आहेत. माझा लाल उद्या मोठा साहेब होणार आहे. मोठा कर्तृत्ववान माणूस बनणार आहे. तुम्हाला जर त्या मायबापाचे आशावादी डोळे दिसत नसतील, तर तुमच्यासारखे दळभद्री, नालायक, पापी फक्त तुम्हीच आहात. म्हणून तुमचे करिअर पहा, स्वतःला झोकून देऊन यशस्वी व्हा.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

http://: https://nagebabaudyojakmanch.org/१८-यशाचा-कानमंत्र-4/

 

error: Content is protected !!