१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

३) एकाग्रता – Concentration

शिवबाराजे यशस्वी लोकांना असलेली तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे एकाग्रता. यशस्वी होणारी माणसे त्यांच्याहाती असलेले काम किंवा त्यांनी हाती घेतलेलं प्रत्येक काम हे पूर्ण एकाग्रतेने करत असतात. यशस्वी व्हायचे तर तुमचा तुमच्या कामावर नीट फोकस पाहिजे. तुमचे काम तुम्हाला पूर्ण एकाग्र चित्ताने करता आले पाहिजे. चित्त एकाग्र करणे म्हणजे काम करताना डोक्यात इतर कोणाताही दुसरा विचार न आणता केवळ हाती घेतलेल्या कामाचाच विचार करायचा आणि हाती घेतलेलं काम तहानभूक विसरून पार पाडायचे. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरे कोणतेही काम हातात घेऊन आपले लक्ष विचलीत करायचे नाही. एकावेळी एकच काम एकच उद्देश आणि कामाची पुर्तता केल्याशिवाय थांबायचे नाही. मौन, चिंतन, योगा याने प्रथम आपले चित्त शांत करावे आणि मग एकाग्र चित्ताने काम करावे. एकाग्र चित्ताने काम करणारालाच यश मिळते तेव्हा जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आधी मन एकाग्र करायची सवय स्वतःला लावा. आणि लक्षात ठेवा एकाग्र चित्त असणारी माणसं कधी इतरांमुळे, परिस्थितीमुळे विचलीत होत नाहीत की रागावत नाहीत. ते मनःशांती बिघडू देत नाहीत. तेव्हा शांत रहा, एकाग्र चित्त रहा आणि काम करत रहा यश तुमचेच हाती आहे. आणि यश तुमच्याच पायावर येऊन पडणार आहे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

 

error: Content is protected !!