२६. महान बना
महान बनणे म्हणजे तुमच्या क्षेत्रात तुम्ही ३ टक्क्यांत येणे होय. त्यासाठी आज तुम्ही जसे आहात, तसे स्वतःला स्वीकारा आणि ९७ टक्के लोक जे करतात ते तुम्ही न करता ३ टक्केवाल्यांना आदर्श मानून, त्यांच्या चांगल्या सवयी, चांगल्या गुणांना फॉलो करा. तसेच तीन टक्क्यांत येण्यासाठी जे जे करावे लागते ते विनाअट, विना तक्रार करायला आजपासून सुरुवात करा.
तुम्ही निश्चित महान बनाल. साधूसंत म्हणतात नाम जपण्याने देव प्रसन्न होतो. म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हणजे तुम्हाला विठ्ठल प्रसन्न होईल. एखादा नास्तिक म्हणाला मी विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही. तर त्याला कदापी विठ्ठल प्रसन्न होणार नाही. याचा अर्थ देवांनाही स्तुती प्रिय आहे. आपण तर हाडामासाची माणसे आहोत. म्हणून तुम्हाला महान बनायचे असेल तर तुमच्या सांनिध्यातील लोकांशी प्रेमाने बोला, त्यांच्या चांगल्या गुणांची स्तुती करा. तुम्ही महान बनणारच.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
