२९.लीडर्स बना आणि नेतृत्व करा !

२९.लीडर्स बना आणि नेतृत्व करा !

असे म्हणतात coming together is the begining, keeping together is the work and working is the success or progress. यशासाठी टीम लीडर, टीम स्पिरीट आणि टीमवर्कची अत्यंत जरुरी असते. लीडर हे फक्त पद नसून, ती एक जबाबदारी आहे. ती जो घेतो तोच नेतृत्व करतो. आणि तोच लीडर बनतो. कुटुंबप्रमुखाला, व्यवसाय, ऑफिसच्या प्रमुखाला, गावच्या, तालुक्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखाला लीडरच म्हणतात.

लीडर कसा असतो ? : रावणाकडे महादेवाचे वरदान होतं. खूप मोठे विशाल असे सैन्य आणि युद्ध सामग्री होती, त्यामुळेच रावणाला हरवणे देवांनाही अवघड होते. परंतु दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्राबरोबर फक्त त्यांचा
भाऊ लक्ष्यण होता. तरीही प्रभू रामचंद्राने रावणाला हरवले. कारण प्रभू रामचंद्रामध्ये नेतृत्व गुण होते. त्यांनी अकुशल वानरांची कुशल वानर सेना तयार केली. हनुमंत, जांबुवंतासह रावणाचा भाऊ बिभीषणालाही कुशलतेने आसन्या बाजूला वळवून बलाढ्य रावणाचा पराभव केला. हे एक लीडरशिपचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!