४२ .तीन टक्क्यांच्या श्रेणीत या
यश मिळविणे म्हणजे फक्त पैसा कमावणे नव्हे ! ९७ टक्के लोक पैसा म्हणजे यश समजून पैशाच्या मागे धावत असतात; परंतु पैसा हा उरलेल्या तीन टक्के लोकांच्या मागे स्वतःहून धावत असतो. हेच आजचे वैश्विक सत्य आहे. हे तीन टक्के लोक पैशासाठी काम करीत नाहीत. त्यांचे काम हे त्यांच्यासाठी एक पेंशन किंवा आवड असते. ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जीव ओतून काम करीत असतात. म्हणूनच न मागता पैसा त्यांच्याकडे जातो. याच तीन
टक्के लोकांचे जगावर अधिराज्य असते। कोणत्याही क्षेत्रातील हेच तीन टक्के अमाप पैसा, मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवितात. उरलेला सर्व गाळच किंवा कचरा असतो. हेच उरलेले ९७ टक्के लोक या तीन टक्के लोकांकडे पाहून, त्यांना आदर्श मानून त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन पळत असतात.
सगळे म्हणतात गाय दूध देते. परंतु तसे नसते, गायीचे दूध काढावे लागते. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हे खरे नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना नही, कुछ जादा करना पडता है.
माझा जन्मही ८० टक्के सामान्य लोकांतच झाला. पण मला माझा जन्म कशासाठी झाला हे समजल्यानंतर बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा ठेऊन मी ३ टक्क्यांमध्ये आलो. तुमचा जन्म ८० टक्क्यात झाला असला तरी तुम्हीही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून सर्वस्व पणाला लावून तीन टक्क्यांत पोहचा व जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
