४६ .कल्पनाशक्ती वाढवा

४६ .कल्पनाशक्ती वाढवा

परमेश्वराने माणसाला अद्भूत अशी कल्पनाशक्ती (Imagination Power) दिलेली आहे. असे म्हणतात, जे न देखे रवि ते देखे कवि इतकी कल्पनाशक्तीची ताकत असते. कल्पनाशक्तीच्या जोरावर मोठमोठ्या गोष्टी साकारू शकतात. इंजिनीअरिंग हे कल्पनाशक्तीचे अद्भूत उदाहरण आहे. इंजिनीअर मोठमोठी धरणे, कारखाने, रेल्वेमार्ग, कालवे, भुयारी रेल्वे आदी प्रकल्प सुरू करण्याअगोदर अभ्यासपूर्वक कल्पनाशक्तीने सर्व प्लॅन तयार करतो. सर्व शक्यतांचा विचार करूनच प्रत्यक्ष कामाला लागतो. जसे पाऊस पडेल तशी धरणाची भिंत उचलत नाही, घर बांधल्यावर दारे, खिडक्या लावत नाही. हे सर्व आधीच ठरवावे लागते. इंजिनीअर आधी कल्पना करतो. अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून ते प्रत्यक्षात उतरवितो. तेव्हा तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे, त्याची कल्पना अगोदर मनात आणून व्यवस्थित प्लॅनिंग करा व नंतर प्रत्यक्ष आचरणात आणा. तुमच्या व्यवसायाचे, क्षेत्राचे तुम्हीच परिपूर्ण इंजिनीअर बना. कल्पनाशक्तीचे महत्त्व जाणा व यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!