४९.सातत्य : Consistency
असे म्हणतात, Success is a product of daily habits and not random activity. तुम्ही एक दिवस जीममध्ये घाम गाळला, तर वजन कमी होईल का? एक दिवसभर चिनी भाषा शिकलात तर चिनी बोलू शकाल का? एका दिवसात खूप काटकसर केली, एकच दिवस घराची स्वच्छता केली तर काहीच फरक पडणार नाही. पण तुम्ही चांगल्या गोष्टी थोड्याथोड्या पण सातत्याने केल्या तर फरक पडू शकतो. तुम्ही कालच्या पेक्षा आज एक टक्का चांगले केले तर वर्षभरात तुम्ही ३८०० टक्के चांगले बनाल. जर एक टक्का वाईट केले तर वर्षभरात ३८०० टक्के वाईट बनाल. म्हणून चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टीत सातत्य ठेवा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
