४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
६. लोकं गोळा करा.
राजे तुमच्या हाती उत्कृष्ट माहिती मिळाली, तुम्ही उत्तम नियोजन देखील केले परंतु त्या उपक्रमावर योजनेवर काम करणारी योग्य माणसं जर तुमच्याकडे नसतील तर मग काय उपयोग. तेव्हा राजे तुम्ही सक्षम होत आहात तशीच आणखी सक्षम अशी शेकडो माणसं निर्माण करा. मोठं काम एकट्या शिवबांनी नाही करायचं, फार मोठी मोठी कामे करायला प्रति शिवाजी निर्माण करायचे. त्यासाठी लोकांना प्रेरणा द्यायची, प्रशिक्षण द्यायचे आणि दिलेले प्रशिक्षण कामी आणण्यासाठी मोहीम द्यायची, कामगिरी द्यायची.
आपली माहिती तपासली जाईल, सिस्टीमची खात्री करता येईल आणि माणसं जोखता येतील. उत्तम कामगिरी करणारांना पुढे उत्तम पदे द्या, आणखी नवी संधी द्या. लक्षात ठेवा घोडा पडून ठेवायचा नाही आणि माणूस बसून ठेवायचा नाही. माणसाच्या हाताला सतत काहीतरी नवनवीन काम देत गेलं पाहिजे. आपल्या स्वराज्याचा कणा हा सर्वसामान्य माणसं आहेत. आणि या सर्वसामान्य माणसांमधूनच आपणाला असामान्य माणसं घडवावी आहेत भाणसं उभी राहिली तर स्वराज्य उभं राहण्यासाठी वेळ तो किस्ता लागेल आणि माणसाची प्रगती झाली तर स्वराज्याची प्रगती व्हायला वेळ ततो कितीसा लागेल. तेव्हा पहिली आपण माणसं घडवा जी स्वराज्य घडवतील. आपल्या पदरी असलेला प्रत्येक माणूस हा सोन्याचा आणि अमूल्य किमतीचा असाच घडेल याची काळजी घेऊया. हिच घडवलेली माणसे स्वराज्य उ करतील, वाढवतील आणि बाका प्रसंग आला तरी त्यातून सावरून पुढे नेतील, तेव्हा आपलं मनुष्यबळ ही सर्वात मोठी संपती समजून ती जपून वापरा, एकवेळ विजय नाही मिळाला तरी चालेल परंतु माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्या. कारण जर ही माणसं जगली तर पुन्हा नेटाने लढतील, जोमाने पुन्हा उभी राहतील आणि स्वराज्य वाढवतील. पण ती खचीं पडली तर पुन्हा अशा असामी घडविण्यासाठी जो वेळ लागेल तो आपल्याकडे नक्कीच नाही. तेव्हा माणसं जपा, स्वराज्य आपोआप जोपासल जाईल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
