५. प्रेरणा देण हे अवघड काम आहे.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तेव्हा कोणाला काय आवडेल आणि कोणाला काय आवडणार नाही हे सांगणं खूप अवघड. त्यामुळे प्रत्येकाची प्रेरणा स्थळं किंवा प्रेरणादायी प्रसंग वेगवेगळे असू शकतात. काहींना पैशातून प्रेरणा मिळते तर काहींना विचारातून. काहींना माणूसकीतून प्रेरणा मिळते तर काहींना व्यवसायिकतेतून प्रेरणा मिळते किंवा कधी असंही घडतं की एकाच व्यक्तीला प्रेरणा देणारे घटक वेगवेगळ्या वेळी प्रसंगी वेगवेगळे असू शकतात. कधी तो पैशाने काम करील तर कधी विचाराने प्रेरीत होऊन काम करेल तर कधी सामाजिक बांधिलकी म्हणून तर कधी राष्ट्रभावनेतूनही काम करण्याची त्याला प्रेरणा मिळेल. आणि कधी-कधी असंही होऊ शकतं की त्याला कशातूनच प्रेरणा घेता येणार नाही. अर्थात अशा माणसाला मूर्दाड म्हणण्याशिवाय पर्याय नाही तो भाग वेगळा.
म्हणून यशस्वी नेता किंवा व्यवस्थापकाच्या यशाचं रहस्य काय तर कोणाला काय पाहीजे याची त्याला चांगली जाणीव असते आणि तसे तो काळ, वेळ, प्रसंग, माणूस पाहून प्रेरणादायी गोष्ट म्हणून काय समोर मांडायचे हे व्यवस्थीतपणे ठरवत असतो.
शिवाजी महाराजांना लोकांना प्रेरणा कशातून मिळेल याची जाणीव होती आणि म्हणूनच ३०० वर्ष गुलामीला अन्यायाला कंटाळलेल्या लोकांना त्यांनी स्वातंत्र्याची न्यायाची प्रेरणा दिली आणि परक्यासाठी राबण्याऐवजी स्वतःच्या राज्यासाठी लढण्याची प्रेरणा देऊन स्वराज्य उभं केलं. जगाच्या पाठीवर महाराजाचं नाव अमर होण्यामागे एकच कारण म्हणजे त्याचे अभूतपुर्व यश आणि त्या यशाचे कारण म्हणजे प्रेरणा देणं हे अवघड काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
