५०.भावनात्मक स्वप्न:Emotional Dream
स्वतःवर विजय मिळवायचा असेल तर डोक्याचा वापर करा आणि समोरच्यावर विजय मिळवायचा असेल जलविद डोके आणि हृदयाचा बापर करा. इमोशन्स, भावना या सर्वात पावरफुल असतात असा सिद्धांत सांगतो.
तुम्ही शोले सिनेमा पाहिलाच असेल. मी ११ वेळेस पाहिला. शोले सिनेमांमध्ये जय आणि वीरू हे दोन मित्र असतात आणि त्यांचे ध्येय हे फक्त पैसे कमवणे असते. म्हणूनच ते फक्त पैशासाठी गब्बर सिंगला पकडून देण्याचं
काम स्वीकारतात. वीरू, जय, गाववाले आणि ठाकूर हे सर्व प्रयत्न करूनही गब्बर सिंगला पकडू शकत नाहीत, पुढे एका लढाईत जय मरतो. त्याच्यां हातातील कॉइन पाहून धर्मेंद्रला धक्का बसतो आणि तो म्हणतो दोस्त तुने मुझे फसा दिया ! प्रेमाखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून, खोटे बोलून मला बसंतीला सोडवण्यासाठी पाठवले. त्यावेळी वीरूच्या डोळ्यात रक्त उतरते. आणि तो एक डायलॉग म्हणतो की गब्बर मैं आ रहा हूं! अब मैं तुझे नहीं छोडूंगा! तुने मेरे यार की जान ली है! आणि तो घोड्यावर बसून जातो आणि गब्बर सिंगला पकडतो.
अनेकाना प्रश्न पडतो की हे कसे शक्य आहे? अगोदर वीरू, जय, ठाकूर आणि गाववाले सगळे मिळून त्याला पकडू शकत नाहीत. आणि आता धर्मेंद्र एकटाच त्याला कसा काय पकडतो? तुम्ही म्हणाल सिनेमाच्या डायरेक्टरला तसे दाखवायचे असेल, म्हणून तसे दाखवले असेल. ते खरे नाही, कारण जय जिवंत होता तोपर्यंत या दोघांचे ध्येय हे पैसे कमवणे म्हणजे फायनान्शियल ड्रीम होते. परंतु जय मेल्यानंतर विरू म्हणजे धर्मेद्रचे ध्येय गब्बरला मारून बदला घेणे हेच असते. कारण इमोशनस ! म्हणजे भावना. म्हणूनच म्हणतात
Emotional dream is more powerful than any dream.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
