५३ .मोठ्या विचारांची मोठी जादू
असे म्हणतात, आप बड़ा सोचेंगे तो बडा बनोगे। आप जैसा सोचेंगे वैसाही बनेंगे, जैसी सोच वैसी पोच. मोठा विचार साधा असतो पण सोपा नसतो. एका कंपनीच्या १० सेल्समनपैकी एक नंबरच्या सेल्समनने इतरांच्या मानाने सहापट जास्त विक्री केल्याने त्याचे उत्पन्नही सहापट जास्त होते. त्या सेल्समनचे शिक्षण, हुशारी, मेहनत, अनुभव हा इतरांप्रमाणेच होता. फरक फक्त विचारांत होता. एक नंबरच्या सेल्समनचे विचार इतरांपेक्षा सहापट जास्त मोठे होते. हीच मोठ्या विचारांची ताकत. खरे तर तुमच्या विचारांच्या आकारावरच तुमच्या बँक अकाउंट, सुखाचे अकाउंट व समाधानाच्या अकाउंटचा आकार अवलंबून असतो. आज जगात ८०० कोटी लोक आहेत. ते एकसारखे नाहीत. मग त्यांचे विचार एकसारखे असतील का? २० टक्के लोकांकडे ८० टक्के संपत्ती आहे, ती त्यांच्या मोठ्या विचारांमुळेच ! ती जर सर्वांना सारखी वाटून दिली तरी पाच वर्षांनंतर हे प्रमाण पहिल्यासारखे २० : ८० होणारच! याचे कारण त्यांचे विचार. मोठा विचार ही परमेश्वराने दिलेली देणगीच आहे. तसा विचार करा व यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
