५५.१००% लक्ष केंद्रित कसे करावे ? : Focus
महाभारतात अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोलाच दिसत होता, म्हणूनच अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. मॅग्निफाईड ग्लास म्हणजेच भिंगातून सूर्याची किरणे एकाच बिंदूवर केंद्रित केली. तर त्याखाली असलेल्या कागदाला आग लागते.
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना एकदा विचारलं की तुम्ही लग्न का केले नाही? तेव्हा ते म्हणाले लग्न करायचं मी विसरूनच गेलो. याचा अर्थ त्यांचा फोकस १०० टक्के हा त्यांच्या ध्येयावर होता. आजचे तरुण लग्नापेक्षा त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतील का? तुमचा फोकस असेल तरच तुम्ही सुईमध्ये दोरा ओवू शकता, नसता नाही.
ग्रेट बॉक्सर ब्रुस ली म्हणतो, १० हजार पंच मारणाऱ्या बॉक्सरची मला भीती वाटत नाही. पण जो बॉक्सर एकाच ठिकाणी फोकस लावून फक्त
१००० पंच मारतो. त्याची खूप भीती वाटते. कारण त्यामुळेच तो मास्टर झालेला असतो. आणि म्हणूनच त्याला कोणीही हरवू शकत नाही. ग्रेट ब्रुस ली चे एक गोल्डन स्टेटमेंट आहे, ते म्हणजे एक योद्धा हा तसा सामान्यच असतो. फक्त त्याचा फोकस हा लेझर किरणासारखा असतो म्हणूनच तो जिंकतो. सचिन तेंडुलकर म्हणतो ज्या बॉलवर फोकस म्हणजे लक्ष केंद्रित होत नाही. त्या बॉलवर नक्की विकेट पडते. सरदार मिल्खा सिंगचा भाग मिल्खा भाग या सिनेमात कमरेला दोराने टायर बांधून तो पळतो असतो. त्याच्या गुरुने मिल्खा सिंगला कागदावर लिहून दिले होते, मिल्खा तुझा फोकस फक्त ४०० मीटर रनिंग आणि ४५.९ सेकंदावरच ठेव. तोच फोकस मिल्खा सिंगने ठेवला म्हणूनच मिल्खा सिंगने ८० पैकी ७७ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
