५६.आपला जन्म जगण्यासाठी का जिंकण्यासाठी?
जिवंत तोच आहे, ज्याचे प्रयत्न जिवंत आहेत. लढतो तोच आहे, ज्याच्यातील आग जिवंत आहे आणि जिंकत तोच आहे, ज्याचे ध्येय जिवंत आहे. जगात ८०० कोटी तर भारतात १४२ कोटी लोक जगत आहेत. त्यापैकी ९० टक्के लोक हे मृत्यू येत नाही म्हणून जगत आहेत. परंतु १० टक्केच लोक हे जिंकण्यासाठीच जगत आहेत. आपला जन्म हा जगण्यासाठी का जिंकण्यासाठी?. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पोट भरण्यासाठी जगत असाल तर, प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. देवाने चोच दिली तर दाणाही देणारच ना! मग ते काम करून, भीक मागून, चोरी करून किंवा
बापजाद्याच्या कमाईवर जगायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
तुमचे जीवन हे जिंकण्यासाठी असेल तर, स्वतःला ओळखा. मी कोण आहे? माझ्या जन्म कशासाठी झाला आहे. मरण्यापूर्वी मला काय करायेण ते आगोदर ठरवा. यशस्वी जीवन जिंकण्याची त्रिसूत्री अशी आहे, स्वतायचे ओळखा, आवडीचे क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत बना. त्यानंतर तुम्ही जिंकलात म्हणूनच समजा. पण त्यासाठी फक्त स्वप्न न रंगवता मोठे ध्येय अर्थात गोल सेट करा. छोटे मोठे गोल बुकात लिहा व ते पूर्ण करण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न करा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
