५९.लोक काय म्हणतील हे ऐकू नका

५९.लोक काय म्हणतील हे ऐकू नका

जे लोक शिखरावर पोहचले त्यांनी लोकांचे नव्हे तर आपल्या अंतर्मनाचेच ऐकले. म्हणून यशोशिखरावर पोहचेपर्यंत बहिरे व्हा. एखाद्या व्यक्तीने चिनी भाषेत शिव्या दिल्या तर आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. लोक घोड्यावर बसू देत नाहीत व पायीही चालू देत नाहीत. एका फळाच्या दुकानातील पाटीवर लिहिले होते, इथे ताजी फळे विकली जातात. एक व्यक्ती म्हणाली, दुकान तर इथेच आहे, मग इथे शब्द कशाला? पुसा. त्याने पुसला. दुसऱ्या व्यक्तीने ताजी शब्दाला आक्षेप घेतला. तू काय सडकी फळे विकतो काय ? पुसून टाक. त्याने पुसले. तिसऱ्या व्यक्तीने फळे शब्द कशाला ? तू अंडी विकतोस काय? पुसून टाक. त्याने पुसले. चौथ्या व्यक्तीने विकली जातात, असे कशाला ? तू काय फुकट देणार आहेस? पुसून टाक. त्याने पुसले. सर्वच पुसून टाकल्यावर पाचवी व्यक्ती म्हणाली, इतक्या सुंदर पाटीवर काही तरी लिह. त्यामुळेच लोकांची पर्वा कराल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. एका गावात एक प्रसिद्ध चित्रकार होता. त्याने एक सुंदर चित्र काढून मुख्य चौकात लावले. आणि त्याखाली लिहिले की या चित्रात काही चूक असेल, कमी असेल तिथे मार्कर पेन ने रेघ ओढा. संध्याकाळी जेव्हा चित्रकारांनी चित्र पाहिले. तेव्हा संपूर्ण चित्र हे मार्करनी खराब केले होते. या चित्रात अनेक कमी आहेत असेच लोकांनी दाखवले होते. चित्रकार खूपच नाराज झाला. शेवटी त्याच्या एका हुशार मित्राने या चित्रकाराला सांगितले की, तू उद्या असेच नवीन चित्र त्याच चौकात लाव. आणि त्याखाली लिहून ठेव की, या चित्रात काही चूक असेल, कमी असेल. तर ती दुरुस्त करावी. संध्याकाळी जेव्हा चित्रकारांने चित्र पाहिले. तर त्या चित्रावर कोणीही, काहीही लिहिले नव्हते. किंवा दुरुस्ती केली नव्हती. दुसऱ्यांना दोष देणे, नावें ठेवणे, निंदा करणे खूप सोपे असते. परंतु स्वतः त्या दूर करणे कठीण असते. म्हणून लोक काय म्हणतात. याकडे लक्ष देऊ नका. आणि तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!