६३.’४ E’चा फॉर्म्युला

६३.’४ E’चा फॉर्म्युला

१) पहिला E म्हणजे एज्युकेशन, म्हणजेच ज्ञान

तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याची तुम्हाला आवड असणे गरजेचे आहे. सोबत त्या व्यवसायाचं सखोल शिक्षण आणि ज्ञान असणे गरजेचे असते. आता तुम्ही म्हणाल शिक्षण आणि ज्ञानात काय फरक? तर सांगतो. शाळा, कॉलेजमध्ये जे शिकवले जाते त्याला शिक्षण म्हणतात. पुस्तकात ज्ञान असते. आपल्याला १०० पैकी ३५ मार्क पडले तरी आपण पास होतो. याचा अर्थ पुस्तकातील १०० पैकी ६५ टक्के ज्ञान आपल्याला येतच नाही. ते ३५ टक्के ज्ञान फक्त डिग्री मिळविण्यासाठी पुरेसे असते. पण उद्योग व्यवसायातील मोठ्या यशासाठी १०० टक्के ज्ञान गरजेचे असते. उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, आवडीचे क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात ज्ञानी बना.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!