६३.’४ E’चा फॉर्म्युला
३) तिसरा E आहे Experiance म्हणजे अनुभव आपण परीक्षेत पास झालो म्हणजे आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी
आलो असे होत नाही. त्यासाठी त्या क्षेत्राचा अनुभव घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याला ट्रेनिंग, अॅप्रेंटिस किंवा प्रोबेशन म्हणतात. तुम्ही डॉक्टर झालात, वकील झालात, सीए झालात म्हणून लगेच तुम्हाला व्यवसायात यश मिळणार नाही. समजा तुम्हाला डॉक्टरांची पदवी मिळाली आणि तुम्ही लगेच ऑपरेशन करायला गेलात तर, रुग्ण जगण्याऐवजी मरण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच परीक्षा पास झाल्या वर सुद्धा Experience अनुभव घ्यावाच लागेल. आपणास जो व्यवसाय करायचा त्या क्षेत्रातील चांगल्या ठिकाणी, पगारासाठी नव्हे तर अनुभवासाठी नोकरी करा. त्यामधून तुम्ही उत्तम व प्रतिभावंत बनाल. अनुभव घेतल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल, त्यांनंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यास तुम्ही १०० टक्के यशस्वी व्हाल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
