६४ .कर्तव्याला जागा
यशस्वी लोक कर्तव्याला सर्वोच्च महत्त्व देतात. म्हणूनच ते यशस्वी असतात. त्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली आणि कर्नाटक यांच्यात क्रिकेटचा रणजी सामना चालू होता. एक मुलगा ४० धावा काढून सायंकाळी घरी आला. रात्री दोन वाजता त्याच्या आईने त्याला उठविले व सांगितले की तुझ्या बाबांना देवाज्ञा झाली. त्यावेळी त्या मुलाने त्याच्या कोचला फोन करून विचारले, सर मी काय करू? त्याच्या सरांनी सांगितले, तुझे बाबा गेले हे खरे असले तरी तुझी संघाला गरज आहे. संधी परत परत मिळत नसते. तो मुलगा सकाळी मैदानात गेला व ९० धावा काढून संघाला जिंकून दिले. नंतर घरी येऊन वडिलांचे अंतिम क्रियाकर्म केले. तो मुलगा म्हणजेच स्टार क्रिकेटर विराटकोहली. वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरच्या बाबतीत असेच घडले होते. तेव्हा कर्तव्याला जागा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
