७२ पैशाचे व्यवस्थापन Money management

७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management

२) योग्य ठिकाणी गुंतवणूक करा-

अभ्यास करून विचारपूर्वक योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास खूप चांगला फायदा होतो. नोकरीच्या माझ्या पहिल्या १० वर्षांत मी बचत केलेले पैसे माझ्या जॉइंट फैमिलीतील माझ्या भावासाठी खर्च केले, जे शेती करत होते. त्यांना विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर, ट्रक घेऊन कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी ते पैसे वापरले. तो माझा खर्च नव्हता, तर माझ्या एकत्र कुटुंबाच्या भावी काळासाठी केलेली गुंतवणूकच होती. त्यानंतर मी माझ्यासाठी गुंतवणूक म्हणून काही प्लॉटमध्ये गुंतवणूक केली. १९९० साली १० रुपये स्क्वेअर फूट दराने घेतलेल्या प्लॉटचा भाव आज १० हजार रुपये स्क्वेअर फूट झाला आहे. ३०/३२ वर्षांत १००० पट. याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा फॉर्म्युला. तो मला लवकर समजल्यामुळेच सर्व गुंतवणुकीतून मला प्रचंड फायदा झाला. अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक वाढू शकते. हा नियम लक्षात ठेवा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!