७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management
४) हप्त्यावर मिळतो म्हणून हत्ती विकत घेऊ नका-
आज तुम्हाला गरज नसलेल्या वस्तू तुम्ही विकत घेतल्या ना, तर पुढे तुम्हाला गरजेच्या वस्तू सुद्धा विकून जीवन जगावे लागेल असे एक सिद्धांत सांगतो. हप्त्यावर मिळतो म्हणून कोणी हत्ती विकत घेतो का? त्याची गरज आहे का? त्याचा मेंटेनन्स आपल्याला परवडेल का? याचा अगोदर विचार करा. कोरोना काळात अनेकांच्या धंद्याचे, नोकरीचे उत्पन्न बंद पडल्याने ते ईएमआय, हप्ते भरू शकले नाहीत, त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले. काहींनी तर आत्महत्या केल्या. याचे कारण गरज नसलेल्या वस्तू ईएमआय वर, हप्त्यावर विकत घेतल्या. मित्र आणि नातेवाईकाना इम्प्रेस करण्यासाठी महागडे मोबाईल, लक्झरीयस कार आणि गरजेपेक्षा मोठे घर घेऊ नका. खोटी प्रतिष्ठा दाखविण्यासाठी, कर्ज काढून लग्न कार्यात जास्तीचा खर्च करू नका. बँकेकडे प्रचंड पैसा असतानाही बँका त्यांना लागणारे ऑफिसेस भाड्याने घेतात. कारण ऑफिस विकत घेताना जो खर्च होतो त्याच्या व्याजापेक्षा अर्ध्या व्याजात ऑफिस भाड्याने मिळते. बँका तेच पैसे व्याजाने देऊन उत्पन्न कमवतात. ती एक डेड इन्व्हेस्टमेंट असते. हा मनी मॅनेजमेंटचा नियम समजून वागा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
