८३.मीच का?
एखादी खादी दुःखद घटना घडली की आपण दुःखी निराश होऊन नशिबाला आणि देवाला दोष देतो. मी इतके चांगले वागूनहीं देवाने माझ्यावरच अन्याय का केला? असा प्रश्न सर्वसाधारण लोक विचारीत असतात. परंतु महान आणि यशस्वी लोक याउलट विचार करतात म्हणूनच ते महान आणि यशस्वी असतात. ऑर्थर अॅश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ऑर्थर अॅश हा नावाजलेला टेनिस खेळाडू होता. विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची महान कामगिरी त्याने १९७५ साली केली होती. त्यानंतर दुर्दैवाने त्याला ब्लड कॅन्सर झाला.
त्यानंतर ऑपरेशन करताना त्याला एचआयव्हीची लागण झाली. १९८३ साली तो मृत्यूशी झुंज देत असताना त्याचे चाहते अस्वस्थ झाले होते. अनेकांनी त्याला पत्र पाठविली. एकाने तर पत्रात लिहिले की इतक्या वाईट रोगासाठी देवाने तुलाच का निवडले? त्यावर ऑर्थरने उत्तर दिले ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. व्हायरल झाले, त्यामध्ये अॅश लिहितो की जगभरात दरवर्षी पाच कोटी मुले टेनिस खेळायला सुरुवात करतात. त्यातील ५० लाख मुले बऱ्यापैकी टेनिस शिकतात. त्यामधील पाच लाख मुले व्यावसायिक टेनिसपटू म्हणून बनतात. त्यामधील ५००० मुले ग्रँड स्लॅम स्पर्धेपर्यंत पोहोचतात. त्यातील फक्त ५० जणच विम्बल्डनचा टप्पा गाठतात. त्यामधील फक्त ४ सेमी फायनल व २ फायनल मध्ये खेळतात व त्यामधून एकच खेळाडू विम्बल्डन विजेता होतो. अशा सर्व प्रक्रियेतून जात मी १९७५ साली विम्बल्डन ची ट्रॉफी जिंकलो. त्यावेळी मी देवाला मीच का, ? विम्बल्डन विजेता म्हणून माझीच निवड का केली? असा प्रश्न विचारला होता का? मग आज अशा वाईट अवस्थेसाठी तरी मी देवाला का विचारू, मीच का, ? असा प्रश्न मी देवाला कधीच विचारणार नाही. म्हणून मित्रांनो एखादी वाईट घटना घडली, अपयश आले तर देवाला किंवा इतरांना दोष देऊ नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
