व्यवस्थापनाची चौदा रत्ने
आता व्यवस्थापनाचे सिद्धांत काय तर ते म्हणजे समुद्र मंथनातून काढलेली चौदा रत्नेच व्यवस्थापनाची अस्त्रे. यशस्वी होण्याची हमखास सूत्रे. यशस्वी व्यवस्थापनाचे चौदा सिद्धांत खालीलप्रमाणे.
१. Division of work कामाचे वाटप
२. Authority and Responsibility: अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल
३. Discipline: शिस्त
४. Unity of command: आदेशाची एकवाक्यता
५. Unity of Direction : एकच दिशा
६. Subordination of interest संस्था अगोदर आपण नंतर
७. Remuneration: योग्य मोबदला
८. Centralisation : एक हाती अधिकार / केंद्रीकरण
९. Scalar Chain आदेशाची साखळी
१०. Order : प्रत्येकाची योग्य जागा
११. Equity : समानता
१२. Stability of tenure : कामाची हमी
१३. Initiative : नवीन गोष्टींचा पुढाकार
१४. Espirit de corps : सहकाऱ्यांना प्रेरणा
ही चौदा रत्ने जी जगभराच्या व्यवस्थापनाच्या शाळेत जमा केलेली असतात किंवा हिच ती चौदा रत्ने विद्यार्थ्यांना गोळा करायला शिकवली जातात. आता कोणी यातील किती रत्नं सोबत घ्यायची तो ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण संस्था ते संस्था, व्यवस्थापन ते व्यवस्थापन, परिस्थिती ते परिस्थिती वेगळे असू शकते.
त्यामुळे शेवटी आपण असेच म्हणुया की व्यवस्थापन म्हणजे एक शास्त्र जे संशोधीत केले जाते आणि एक अशी कला ज्यामुळे ते विकसित होते.
व्यवस्थापन शास्रातील चौदा रत्ने.
१९१६ मध्ये हेन्री फयॉल या व्यवस्थापन तज्ञाने Industrial and general administration नावाचे एक पुस्तक लिहिले त्यामध्ये त्याने व्यवस्थापनातील चौदा रत्नांचा उल्लेख केलेला आहे. हेन्रीच्या मते कोणतीही संस्था मग ती कितीही मोठी असो की छोटी असो त्यांना यशस्वी होण्यासाठी या चौदा रत्नांचा उपयोग होतो. कारण ही चौदा रत्ने म्हणजेच मार्गदर्शक तत्वे असून ती पाळणाऱ्या संस्था यशाच्याच दिशेने अचूकपणे जातात.
हेन्री ज्या गोष्टींबद्दल १९१६ मध्ये बोलतात त्याच गोष्टी २६० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे अंमलात आणून आधुनिक व्यवस्थापनाची पायाभरणी केली असेच म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीला नाव दिल्याची नोंद सापडत नसली तरी ती तत्वे प्रात्यक्षिक रुपात अंमलात आणलेली मात्र आपणास पहावयास मिळतात. ती चौदा रत्ने पुढीलप्रमाणे :
१. Division of work कामाची विभागणी
शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी आठ विभाग पाडले होते हे आपणाला माहित आहे. आपण महाराजांच्या Division of work या तत्वाला अष्टप्रधान मंडळ या नावाने ओळखत आहोत. प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगळा विभाग आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असा अधिकारी म्हणजे मंत्री किंवा व्यवस्थापक. महाराजांचे हे आठ विभाग आणि मंत्र्यांची कामे खालीलप्रमाणे :
१. मुख्य प्रधान (पेशवा) राजपत्रावर शिक्का राजकार्य, पगार सालिना १५००० होन
२. अमात्य (मुजुमदार) जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांच्यावर देखरेख – पगार सालिना १२००० होन
३. सचिव (सुरनिस) राजपत्र विषय सर्व जबाबदारी पगार सालिना १०००० होन
४. सुमंत (डबीर) परराज्यविषयक कार्याचा विचार पगार सालिना १०००० होन
५. सेनापती (सरनौबत) सर्व लष्कर जबाबदारी-पगार सालिना १०००० होन
६. पंडीतराव (दानाध्यक्ष) धर्माधर्म विचार पगार सालिना १०००० होन
७. न्यायाधिश राज्यातील न्यायनिवाडा पत्रे पगार सालिना १०००० होन
८. मंत्री (वाकनीस) अंतर्गत राजकारण राजाची दिनचर्या लिहिणे आमंत्रण,
महाराजांची भोजन व्यवस्था
या सर्व मंत्र्यांना मदत करण्यासाठी नेमलेले दरकदार (अधिकारी)
१-दिवाण,
२- मुजुमदार हिशोब तपासणीस,
३ फडणीस महसुल हिशोब,
४- सबनीस दप्तरदार,
५-कारखानीस पुरवठाधिकारी,
६- चिटणीस,
७ जामदार- खजिनदार,
८- पोतनीस नाणेतज्ञ
महाराजांनी अष्टप्रधान मंडळ बनविले म्हणजे काय तर प्रत्येक विभागाचे किंवा कामाचे Specialisation केले आणि Specialisation चा पुढचा टप्पा म्हणजे आपोआपच ते Innovation ला जन्माला घालते. त्या त्या विभागाने किंवा मंत्र्याने त्याला दिले तेवढेच काम सातत्याने केल्याने तो माणूस त्या कामात निष्णात होतो. आणि त्यातूनच नवीन नवीन शोध युक्त्या जन्माला येतात यालाच म्हणतात Innovation.
यासाठी महाराजांनी तयार केलेले वेगवेगळे विभाग खालीलप्रमाणे –
राज्याच्या अधीन असणारे अठरा कारखाने (State Department)
१. खजिना (कोषागार रोख पैसे)
२. जवाहिरखाना (रत्नशाळा)
३. अंबरखाना (धान्यशाळा)
४. अबदारखाना (पेये)
५. नगारखाना (वाद्य)
६. तालीमखाना (व्यायामशाळा)
७. जामदारखाना (सर्व प्रकारची नाणी)
८. जिरातेखाना (शेती)
९. मुदबकखाना (पाकालय)
१०. शरबतखाना (पानक)
११. शिकारखाना (पक्षीशाळा)
१२. दारुखाना (स्फोटकशाळा)
१३. शहदखाना (आरोग्य)
१४. पिलखाना (हत्तीशाळा)
१५. फरासखाना (अस्तरणागार)
१६. उष्टरखाना (उंटशाळा)
१७. तोफखाना (यंत्रशाळा)
१८. दप्तरखाना (लेखनशाळा)
महाराजांच्या थेट नियंत्रणात असलेले बारा महाल (Centralise De- partment)
१. पोते (खजिना)
२. थट्टी (गोशाळा)
३. शेरी (मनोरंजन, उद्यान)
४. वहिली (रथशाळा वाहनव्यवस्था)
५. कोठी (धान्यागार)
६. सौदागीर (माल)
७. टंकसाल (नाणे छपाई)
८. दरुणी (अंतपूर राणीवसा)
९. पागा (अश्व शाळा)
१०. इमारत (बांधकाम, शिल्प)
११. पालखी (शिबिका)
१२. छबीना (कायदा आणि सुव्यवस्था)
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

