व्यवस्थापनाची चौदा रत्ने – १४. Espirit de-corps: संघ भावना

१४. Espirit de-corps: संघ भावना

व्यवस्थापन शास्राचे चौदावे रत्न म्हणजे संघ भावना. व्यवस्थापन शास्राचे चौदा सिद्धांत मानले जातात त्यातील हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा असा सिद्धांत. संघ भावना वाढीला लावणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं काम असतं आणि त्यानी ते काम उत्कृष्टपणे करुन संस्था, कंपनी यामध्ये काम करणारे सहकारी कर्मचारी यामध्ये एकोप्याची भावना निर्माण केल्याचा खूप मोठा फायदा होत असतो यामुळे कर्मचारी, सहकारी यांची समर्पणाची भूमिका तयार होऊन एक कमीटेड, ध्येयवादी असा वर्ग तयार होण्यास मदत होते.

आता ही एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी वरीष्ठांनी काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्याचा प्रमुख नियम असा आहे की कोणत्याही वरीष्टाने एखादी चूक झाली म्हणून कोणालाही न रागावता त्याच्याकडून पुन्हा चूक होणार नाही यासाठी त्यांना प्रेरणा देणे, प्रशिक्षण देणे, संवाद साधण ही कामे करणे अपेक्षित असते. आणि जरी एखाद्याच्या चुकीमुळे त्याला रागावण्याची वेळ असेल तरी त्याला एकांतात घेऊन आपुलकीने चूक लक्षात आणून देऊन समज देऊन अशी होणारी चूक भविष्यात कशी टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. आणि या उलट एखाद्याने चांगले काम केले तर त्याची एकांतात पाठ न थोपाटता सर्वांसमोर त्याचे कौतुक करुन बक्षिस

देऊन इतर सहकाऱ्यांनाही तसेच काम करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. एखाद्याची चूक लेखी कागदावर देऊन त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याला तोंडी

समज देणे हाही एक मध्यम मार्ग अवलंबता येतो. लेखी पत्राने अधिकार वाणी प्रकट होते तर तोंडी संवाद साधल्याने आपुलकीची भावना तयार होते. माणसं जोडण्याचा सिद्धांत म्हणजेच espirit de corps आणि त्यामुळे जे corps (पीक) येते ते निष्ठेचे आणी प्रामाणिकपणाचे त्यामुळे सहाजिकच कंपनीचा विकास आणि भरभराट होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात या तत्त्वालाच आपले जीव की प्राण समजून त्याचे काटेकोरपणे पालन केलेले दिसते. शिवाजी महाराजांना लोकांमध्ये संघभावना निर्माण करण्यात यश आले म्हणूनच स्वराज्य उभे करता आले.

व्यवस्थापन शास्त्राच्या या गुरुने वयाच्या १५ व्या वर्षी शंभू महादेवाच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा १००० ते १२०० तरुण त्यांच्या सोबत होते. या सर्वांना संघ भावनेची दिक्षा आणि व्यवस्थापन सिद्धांताचे बाळकडू महाराजांनी पाजले त्यामुळे उभ्या आयुष्यात एकही माणूस महाराजांना कधी सोडून गेला नाही. उलटमहाराजांकडे लाखो लाखो लोकांचा ओढा निर्माण झाला. लाखो लोक स्वराज्य या एका ध्येयाने प्रेरीत झाले. एकोप्याने पुढे गेले आणि महाराजांना तक्तावर बसवून एक सार्वभौम राजा म्हणून अभिषेक करण्यात आला.

महाराजांच्या जीवनातील Espirit de corps ची काही ज्वलंत उदाहरणे पाहूया. प्रतापराव गुजरांनी मोठा पराक्रम करुन बहलोल खानाला उमराणीच्या लढाईत शरण आणला आणि त्याने दयेची याचना केली म्हणून जीवदान दिले. अर्थात प्रतापरावांना असा निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी घेतला म्हणजे त्यांनी एक प्रकारे चूकच केली. परंतु महाराजांनी ती पोटात घेऊन प्रतापरावांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करुन सत्कार केला. आणि पुन्हा अथणी रायबाग आदी प्रदेशात मोहीम करण्यासाठी प्रेरणा दिली.

पूढे बहलोल खानाने बेईमानी केली आणि प्रतापरावांना दिलेला शब्द तोडला तेव्हा मात्र महाराज रागावणे स्वाभाविक होते. तेव्हा महाराजांनी प्रतापरावांना सांगितले की हा बहलोल सापासारखा परत उलटला. पुन्हा पुन्हा स्वराज्यावर चालून येतो तेव्हा त्याच्या आक्रमणामुळे जर स्वराज्याचे सर्वसामान्य लोकांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण ? तेव्हा आता बहलोल खान गर्दीस मेळवूनच येणे. म्हणजे प्रतापरावांची चूक पोटात घातली ही एक बाब त्यांचा सत्कार केला ही दुसरी बाब आणि तिसऱ्या टप्प्यात तर त्यांना आता पूर्वीची चुक न करता बहलोलला पकडण्यापेक्षा साफच करा याची प्रेरणा दिली. यालाच म्हणतात Espirit de corps चा सिद्धांत खऱ्या अर्थाने

अंमलात आणण्याची व्यवस्थापनाची पद्धत.

जंजीरा किल्ला जिंकण्यासाठी लाय पाटलाने शिड्या लावून रात्रभर वाट पाहिली परंतु मोरोपंत पिंगळे काही आपले धारकरी घेऊन तटाला भिडला नाही त्यामुळे सहाजिकच तांबड फुटून शत्रूच्या हातात येण्याअगोदरच लाय पाटलाने जंजीऱ्याला लावलेल्या ५०० शिड्या काढून घेतल्या आणि परत माघारी फिरला. महाराजांनी त्या लाय पाटलाला रायगडावर बोलावून घेतला आणि असे प्रचंड धाडस करणाऱ्या मर्दाचा सोन्याचं कडं देऊन, पालखीचा मान देऊन गौरव केला. त्याला पदवी दिली सरपाटील. अर्थात महाराजांनी लाय पाटलाचा हा केलेला गौरव सत्कार भर दरबारात होता तर ज्यांच्या कामचुकारपणामुळे जंजीरा स्वराज्यात येण्याचा धाडसी प्रयोग हुकला त्या मोरोपंताला महाराजांनी झापला. परंतु एकांतात आणि तेही सभ्य साध्या भाषेत मनाला न लागता चूक लक्षात यावी अशा सौजन्यशील शब्दात “पंत मोठ्या कार्यात कोताई केलीत थोर मनसुबा राहून गेला.”म्हणजेच काय तर मोठे कार्य हुकलं तुम्ही कामात हलगर्जीपणा केला आणि पुढची प्रेरणा काय तर थोर मनसुबा आहे तो यावेळी राहिला ठीक आहे पुढच्या वेळी आवश्यक पूर्ण करा. इथे महाराज लेखी मेमो देऊ शकले असते किंवा show cause notice देऊ शकले असते. परंतु esprit de crops म्हणजे संघ भावना एकोप्याची भावना काय असते हे चांगले जाणणाऱ्या जपणाऱ्या महाराजांनी येथे तोंडीच संवाद साधून आपुलेपणा कायम ठेवला. चूक तर लक्षात आणून दिली परंतु माणूस तुटणार नाही याची दक्षता घेतली.

पहा महाराजांचं व्यवस्थापनाच तत्व किती उद्दात आणि दूरदर्शी होते आणि आम्ही मात्र आजचे व्यवस्थापक hire and fire ची भाषा २१ व्या शतकात करत असताना महाराज १६ व्या शतकात सुद्धा किती आर्जवी भाषेत moderate language मध्ये एकोप्याची भावना हे व्यवस्थापनाचे तत्व कसे जपत होते आणि यावरुन आपल्या नक्की लक्षात येते की आज डबल एम.बी.ए. झालेला माणूस आणि महाराज यांच्यात कोण सरस आणि हुशार आहे ते. म्हणूनच की काय महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी जो जयघोष केला गेला त्यात या प्रौढपणाचा जाहीर उल्लेख झाला. प्रौढ प्रताप पुरंधर म्हणजे mature प्रताप म्हणजे efficient आणि पुरंधर म्हणजे excellent. हे तीन शब्द सुरुवातीलाच आले. यालाच म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज तर याबाबतीत आधी केले मग सांगितले First I must do it and then tell to other. First he did it and then he told to others या तत्वानेच वागले.

महाराजांनी निर्माण केलेली ही संघभावना एकोप्याची भावना म्हणजेच स्वराज्य प्रेम राष्ट्रप्रेम एवढ्या ताकदीचे होते की लोक मला मोहीम द्या. मी स्वराज्यासाठी मरायला तयार आहे, मला मरायची संधी द्या असे निधड्या छातीने सांगायचे. आज बक्षिस लावलं तरी माणसं अवघड काम हातात घ्यायला तयार होत नाहीत. तेथे मरायला आणि जीव धोक्यात येईल असा कामांना कशातून तयार होतील. कारण आहे त्याचं संघ भावना निर्माण करणारे कमी पडले आहेत. साहेब कामावर खर्ची पडलो तर भाग्यवान असे मानणारी लाखो लोक निर्माण करणारे शिवाजी महाराज व्यवस्थापन शास्राचे जनकच आहेत हे यातून सिद्ध होते आणि महाराजांनी स्वराज्याचं व्यवस्थापन करताना ही राष्ट्रभावना संघभावना निर्माण केली ती महाराजांच्या मृत्यूनंतरही या देशात कायम राहिली. याला म्हणतात एखाद्या नेत्याचा त्याच्या सहकाऱ्यावर पिढ्यान पिढ्या असणारा प्रभाव.
The esprit de corps principle created by Shivaji Maharaj lasted even after his death and not only his colleagues but also the subjects are still following the management principle, from generation to generation. After 250 years also we can see that Esprit de corps in the people of Maharashtra, India. so he is really a Father of modern Indian management and his management principle are static even in the changing scenario of the 21st century, reason is best principles are always useful, always followed.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!