तू मेरी जिंदगी है

तू मेरी जिंदगी है

रविवारचा दिवस, निलेश सकाळीच ध्यान केंद्रावर येऊन मला चहा प्यायला हॉटेलवर घेऊन गेला. चहा पिताना तो स्वतःच्या बायकोबदद्ल अपशब्द वापरून तिला समजावून सांगण्याची विनंती मला करू लागला. सकाळीच दोघांची तू-तू -मैं-मैं झाल्याचे जाणवले. चर्चेतून निलेशचे तंबाखूचे व्यसन हे भांडणाचं मुळ कारण होतं हे मला समजलं.
मी ही निलेशला तंबाखूचे दुष्परिणाम व पत्नीला त्याच्याविषयीची काळजी या गोष्टींवर सविस्तर भाष्य केले व तंबाखू सोडण्यासाठी आल्याचे तुकडे करून त्यावर थोडा लिंबाचा रस व सैंधव मीठ टाकून ते तुकडे वाळवून एका डबीत खिशात ठेव व तंबाखू खावयाची इच्छा झाली कि हा आल्याचा तुकडा तोडांत टाक असे सांगितले. आल्यामध्ये असलेले सल्फर हे अँटीनिकोटीन चे कार्य करते व तलफ निघून जाते. ‘‘आज नाही उद्या खाईन’’ या मंत्राचा रोज वापर करावयास सांगितला. लवकरच विपश्यना शिबिर करण्याचा सल्ला दिला व निलेशसमोर एक कोरा कागद ठेवून त्याच्या आयुष्यातील 10 महत्वाच्या व्यक्तींची नावे त्याला लिहावयास सांगितली. या 10 नावांमध्ये जी कमी महत्वाची 5 नावे आहेत ती कट करावयास लावली. उरलेल्या 5 नावांमध्ये अजुन 4 नावे कट करून फक्त महत्वाच्या एकाच व्यक्तीचे नाव ठेवण्यास सांगितले. ती व्यक्ती अशी असावी कि ज्या व्यक्तीमुळे तुझ्या जीवनात उणीव भासेन व शेवटच्या श्‍वासापर्यंत तुला तीची गरज असेन. शेवटी निलेश म्हणाला आई-वडील आज ना उद्या जाणार. मुले लग्नानंतर दूर होणार. शेवटी उरणार ती बायकोच. *त्याने अतिमहत्वाची व्यक्ती म्हणून बायकोचे नाव ठेवून बाकी सर्व नावावर रेषा मारल्या.
निलेशला मी डोळे बंद करून बायको तुझ्या आयुष्यात नसेल तर काय-काय परिस्थिती उद्भवेल यावर चिंतन करण्यास सांगितले* व ज्याच्या आयुष्यात पत्नीच नाही त्याच्या आयुष्यातील व्यथा सांगितल्या*. निलेशला माझे म्हणणे पूर्ण पटले. त्याने तंबाखू सोडण्याचे मला वचन दिले व पत्नीचा कुटूंबासाठीचा त्याग त्याने मान्य केला. घरी जाताना मी त्याला पत्नीला एक गुलाब घेऊन जाण्यास सांगितले. हसत हसत तो स्वतःच मला म्हणाला साहेब गुलाब तर घेऊन जातोच पण तो देताना तिला हे ही म्हणतो.

‘‘ तू मेरी जिंदगी है ’’ बंधू-भगिनींनो आपनास हा लेख आवडला असेल, तर आपल्या पार्टनरला” तू मेरी जिंदगी है “एवढ अवश्य म्हणा. किंवा हा लेख पाठवा. व आपलं प्रेम व्यक्त करा.

मी लिहिलेल्या “मनाची मशागत” या बेस्ट सेलर पुस्तकाची पीडीएफ आपणास मोफत हवी असल्यास माझ्या वरील व्हाट्सअप क्रमांकावर रिक्वेस्ट टाका.Be Happy

– डॉ. दत्ता कोहिनकर
माईंड पॉवर ट्रेनर ( Copyright ) मोबा. ९८२२६३२६३०

kohinkarpatil3@gmail. com

error: Content is protected !!