१२. Stability of tenure: कामाची हमी
म्हणजे काय तर लोकांना कामावर ठेवताना रोजगाराची हमी देणे. एखाद्यानं तात्पुरत्या बेसवर किती दिवस काम करावं ? तात्पुरते काम करण्याचा कल टंगळमंगळ माणसाचा असू शकतो आणि चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम असुरक्षित ठेवणं हे वाईट मालकाचं लक्षण असतं. त्यामुळे चांगल्या माणसांना, कर्तबगार माणसांना लवकरात लवकर Permanent कायम केले गेले पाहिजे.
एखाद्या माणसाला नवीन काम देताना त्याला प्रशिक्षण वगैरे देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. नाहीतर त्याच्याकडून कामाची अपेक्षा करायची आणि त्याला त्याचे प्रशिक्षण न देता चांगल्या निकालाची अपेक्षा करायची हे कसे शक्य आहे ?
थोडक्यात काय तर चांगली माणसे सोडून जाऊ नयेत याची काळजी घेणे आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं तर कामचुकार माणसे कायम करायची नाहीत. टंगळमंगळ काम करणाराला आघळपघळ नारळ देऊन मोकळे केलेलच बरं असतं
शिवाजी महाराजाचं व्यवस्थापन कौशल्य एवढं मोठे होतं की त्यांनी कोणाला कामावरुन काढावं लागण्याची पाळी आल्याचं उदाहरण शोधावं लागतं. चांगलं काम करणाऱ्याची महाराज काही मिनीटात पारख करुन त्या हुन्नरबाज माणसाला लगेच नोकरी आणि काम पाहून लगेच कायम करीत असत. कामचुकार माणूस एकतर महाराजांकडे नोकरीला येतच नसत आणि आला तरी महाराजांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे चांगलं काम करणारांना स्वराज्यात कधीच अंतर दिले गेले नाही.
मध्ययुगीन काळातील रोजगाराची पद्धत पाहिली तर आपल्याला कामाची हमा या तत्वाचे महत्व कळते. १६ व्या शतकात लोकांना नेहमी तात्पुरते किंवा हंगामी काम मिळे. म्हणजे काय तर एखाद्या राजाने मोहीम काढली तर त्यावेळी वेगवेगळ्या कामासाठी लोकांना रोजगारासाठी रोजमुरा पद्धतीने (Daily wages) ठेवले जाई. मोहीम संपली की काम संपले. रोजगार संपला की कोणी कितीही चांगले काम केले तरी त्याची सर्फराजी नाही कि कायम नोकरी नाही. कारण सगळा भाडोत्रीचा कारभार कंत्राटी पद्धतीने लोकांना सगळे राजे, रजवाडे कामाला ठेवत असताना महाराज मात्र लोकांना कायम नोकरी, वेतनाची हमी देतात. पहा किती दूरदर्शीपणा असणारे महाराजांचे नेतृत्व या देशाला मिळाले.रोजगाराची हमी देणारा जगातील पहिला राजा कोण असेल तर ते आपले शिवाजी महाराज आहेत हे आपण गर्वाने जगाला सांगितले पाहिजे. महाराजांचे कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे धोरण पाहूनच ७०० पठाण आदीलशहाची कंत्राटी नोकरी सोडून १६५७ लाच स्वराज्यात दाखल झाले. कारण एकच stability of tenure नोकरीची हमी महाराजांचे वय फक्त २७. म्हणजे रोजगाराची हमी देणारे महाराज हे जगातील सर्वात तरुण व्यवस्थापक होते.
महाराजांचे हे धोरण पाहूनच ४०० पोर्तुगीज अनेक इंग्रज फ्रेंच डच महाराजांच्या पदरी नोकरीला आले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोगलासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचे ४००० घोडेस्वार १६७३ मध्ये मोगलांची चाकरी सोडून महाराजांच्या पदरी कामाला आले. छत्रसाल बुंदेला सारखा उत्तरेतून, गंगाराम गुजराथी सारखा गुजरातमधून कवी कलश परमानंदासारखे तत्वज्ञानी, साहित्यिक उत्तरप्रदेश मधून शिवाप्पा नाईक कर्नाटकातून महाराजांच्या पदरी नोकरीला आले होते.
महाराजांच्या व्यवस्थापन तत्व नोकरीची हमी या तत्वावर या सगळ्यांचा किती
मोठा विश्वास असेल याची जाणीव आपणाला होईल आणि म्हणूनच जगातील जवळपास १३ राष्ट्रामधील लोक महाराजांनी स्वराज्यात कामाला ठेवले. त्यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, भिल्ल, लमाण, गौंड, तेलगू, कन्नाडी, तामीळी. उत्तरी बुंदेली गुजराथी, राजस्थानी लोक होते आणि आपण मात्र फक्त महाराष्ट्र आणि मराठी एवढ्यावरच मर्यादीत आहोत. कारण आपण छोटी लोक छोटी दृष्टीकोन बाळगणारी सामान्य माणसं आहोत. महाराज युगपुरुष युगनिर्माते होते. मॅनेजमेंटचे गुरु आणि भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक होते.
महाराजांच्या या धोरणामुळेच स्वराज्यात फक्त Entry होती Exit नव्हती. only incoming not outgoing आणि महाराजांच्या या धोरणाचा परीणाम असा झाला की स्वराज्य दिवसेंदिवस वाढत गेले. तेही अशा प्रतिकूल परिस्थितीतून की पाच-पाच प्रस्थापित शाह्यांना पालथं घालीत. ८०० वर्षाची मोगल सत्ता मोडीत काढीत स्वराज्य जन्माला आलं वाढलं आणि टिकलं देखील. एकदा महाराजांकडे आलेला माणूस स्वराज्यात नोकरीला आलेला माणूस कधीच परत बाहेर पडला नाही. महाराजांना सोडून कधीच कोणी गेला नाही. अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही. महाराजाचं व्यवस्थापन क्षेत्रातील यश जगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

